खैराट शाळा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल
अक्कलकोट (प्रतिनिधी )शिक्षण विभाग अक्कलकोटच्या वतीने क्रीडा स्पर्धा केंद्रस्तरावर घेण्यात आल्या .केंद्रप्रमुख श्रीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनात स्पर्धा आयोजित केल्या गेल्या .केंद्रातील सर्व जि प .शाळांनी भाग घेतला .यात जि .प .मराठी शाळा खैराट अव्वल ठरली . लहान गट कबड्डी मुले उपविजेता लहान गट कबड्डीमुली प्रथम क्रमांक लहान गट 200 मीटर धावणे अंकिता शिवराज घुगरे त्रुतीय क्रमांक .मोठा गट मुली कबड्डी प्रथम क्रमांक खो खो मुली मोठा गट प्रथम लंगडी मोठा गट मुली उपविजेता 100 मीटर धावणे शरणबसप्पा काणे मोठा गट मुले संचिता सरसंबी मोठा गट मुली 200 मीटर धावणे विघेन्श नरोने मोठा गट 200 मीटर धावणे त्रुतीय लक्ष्मी तोळनुरे 200 मीटर धावणे द्वितीय क्रमांक बुद्धिबळ मोठामुले गट प्रथम क्रमांक विघ्नेश नरूने शिफा पटेल मोठा गट मुली बुद्धिबळ लक्ष्मी हणमंत तोळनुरे मोठा गट मुली त्रुतीय क्रमांक मिळविला गौरी गायकवाड स्मिता घुगरे स्वाती तोळनुरे सुप्रिया तोळनुरे सुप्रिया जाधव शिका पटेल अंकिता जमादार लक्ष्मी तोळनुरे मयुरी तोळनुरे व शाळेतील इतर विद्यार्थ्यानी खेळ खेळून शाळेला प्राविण्य मिळवुन दिले .या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन श्रीधर करपे सुनील होनाजी रेखा सोनकवडे फेरोजा नदाफ यांनी केले .बशीर बागवान परमेश्वर मुनोळी चंद्रकांत बटगेरी नबीसाहेब नदाफ संजय चव्हाण दादासाहेब मनोहर मनोज माने अजित ठाकर शीद्धाराम कोतले बडुरे शेख या शिक्षकांनी नेमून दिलेली क्रीडा स्पर्धेची जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली .खैराट शाळेच्या यशाबद्दल रेखा सोनकवडे यांनी खाऊ वाटप करून यशस्वी विद्यार्थ्याचे विशेष कौतुक केले .पालक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळा व विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन केले .
Back to top button
×
No WhatsApp Number Found!