* कल्याणशेट्टी शाळेत घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न *
अक्कलकोट : सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयात अक्कलकोट नगरपरिषद आयोजित स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी नगरपरिषद नियुक्त तज्ञ मार्गदर्शक अजय साखरे व महेश वागदरे यांनी मार्गदर्शन केले.
पर्यावरणात होत असलेले प्रदूषण टाळण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन जनजागृतीची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या वतीने कचरा मुक्त आणि स्वच्छ शहरे अभियान नागरी 2.0 सुरू केले आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना घनकचरा व्यवस्थापन विषयी माहिती दिल्यास भविष्यात ते सुज्ञ नागरिक बनतील, आणि योग्य पद्धतीने कचऱ्याचे विल्हेवाट लावतील.
सुका कचरा,ओला कचरा,सॅनिटरी कचरा आणि घातक कचरा असे कच-याचे चार प्रकार असून घातक व सॅनिटरी कच-याचे विल्हेवाट कशी लावावी या संदर्भात विद्यार्थ्यांना समोर बोलावून चार डस्टबिन बनवून, फ्लॅश कार्ड्स व चित्राच्या माध्यमातून यावेळी काही प्रात्यक्षिके दाखवण्यात आले.
या कार्यशाळेस प्रशालेचे मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेमी विभागाचे दिगंबर जगताप,सागर मठदेवरु,कल्पना स्वामी, निशिगंधा सोमेश्वर आदी शिक्षक व प्रशालेतील इयत्ता 5 वी ते 10 वी वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!