गावगाथाठळक बातम्या

PCMC water supply | गुरुवारी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

प्रतिनिधी/दयानंद गौडगांव

निगडी (प्रतिनिधी): निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील पाणीपुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण जलशुद्धीकरण केंद्रातील स्थापत्य व विद्युत विषय देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवार (दि.२०) रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी दिली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये याकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र. २३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवार दि.२०/११/२०२५ रोजी निगडी जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन आहे.

त्या अनुषंगाने गुरुवार दि.२०/११/२०२५ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच दुस-या दिवशी शुक्रवार दि.२१/११/२०२५ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button