
अंबादास वाघमारे यांची धोत्री शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड
सोलापूर : आहेरवाडी गावचे सुपुत्र, तिल्हेहाळ शाळेचे अत्यंत लोकप्रिय मुख्याध्यापक, शिवशक्ती शिक्षक बचत गट हत्तुरे वस्ती (विमानतळ, सोलापूर) चे विद्यमान अध्यक्ष श्री. अंबादास वाघमारे सर यांची पुरोगामी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) यांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्यांच्यासोबत उपाध्यक्षपदी श्री. आमसिद्ध तिर्थकर यांची निवड करण्यात आली.
वाघमारे सर अतिशय मनमिळाऊ, सहृदय आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून शिक्षक व समाजात ओळखले जातात. हाडाचे शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचा वाटा उचलला असून संघटनात्मक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग व प्रभावी नेतृत्व विशेष मानले जाते. सोप्या, सुस्वभावी आणि सर्वांना जोडून घेणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाची शिक्षक जगतात विशेष दखल घेतली जाते.
ही निवड प्रक्रिया अध्याशी अधिकारी मा. दत्तात्रय मोरे, सहाय्यक निबंधक दक्षिण सोलापूर यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी सुकानू समिती सदस्य अंकुश काळे गुरुजी, रामचंद्र बिराजदार, एजाज शेख, जिल्हाध्यक्ष संजिव चाफाकरंडे, जिल्हा सोसायटी संचालक रमेश घंटेनवरू, आदर्शचे नेते सूर्यकांत व्हनमाने, तालुका उपाध्यक्ष उमेश घागरे, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
अंबादास वाघमारे सर यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


