मंगरूळे प्रशालेच्या विज्ञान उपकरणाची राज्यस्तरावर निवड
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार व राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर यांच्यावतीने दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी सोलापूर येथील सिंहगड कॉलेज येथे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के.एल. ई. संचलित मंगरुळे प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी शांभवी अजगुंडे हिने बनवलेल्या ‘सेफ फ्लाय’ या उपकरणाची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या उपकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील मुले व मुली जेव्हा शाळेत येतात आणि जातात तेव्हा पालक त्यांची घरबसल्या काळजी घेऊ शकतात. तिने एक स्मार्ट आयकार्ड बनवले असून त्यामध्ये वाईस, कॅमेरा व संकटकाळी सूचना देणारे उपकरण आहे. या उपकरणाची मदत शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे. मुलांचे अपहरण होताना किंवा त्यांना रस्त्यावरून जाताना काही अडचणी निर्माण झाल्या तर या कॅमेरामुळे पालकांना आपल्या पाल्यांची समस्या कळणार आहे व त्यावर ते तोडगा काढू शकतात.
शांभवीचे हे उपकरण जिल्ह्यात प्रथम आले असून तिची निवड भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. तिला विज्ञान विभाग प्रमुख महांतेश मठपती, रमेश उमाटे, श्रीशैल कलशेट्टी व प्रियांका अजगुंडे तसेच सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल के.एल. ई. संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, शालेय समिती चेअरमन अनिल पद्देद, शालेय समिती सदस्य अनिल मंगरुळे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम, उपमुख्याध्यापक गिरीश पद्देद, पर्यवेक्षिका आरती तोळनुरे व सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!