सोलापूर-मुंबई वंदे भारतला दौंड स्थानकावर थांबा!
सोलापूर : मध्य रेल्वेने सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील तपशीलांनुसार:
– ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेस २४.११.२०२५ पासून लागू होणार आहे.
दौंड | आगमन: सकाळी ०८:०८ वाजता , प्रस्थान: सकाळी ०८:१० वाजता
– ट्रेन क्रमांक २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस २४.११.२०२५ पासून लागू होणार आहे.
दौंड | आगमन: रात्री ०८:१३ वाजता, प्रस्थान: रात्री ०८:१५ वाजता
रचनेमध्ये आणि इतर थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.
सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक (सीनियर डीसीएम) श्री योगेश पाटील यांनी प्रवाशांना नवीन थांबा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!