Pcmc accident | RMC ट्रकच्या धडकेत १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू ; हिंजवडी- मारुंजी रस्त्यावरील घटना…. आठवडाभरातील दुसरी घटना…

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी): शहरालगत असलेल्या हिंजवडी मारुंजी परिसरात कसारसाई धरणावरून पर्यटन करून घरी परतत असताना दुचाकीला RMC ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिदा इमरान खान असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. मिक्सर ट्रकच्या धडकेने अपघात होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी रीदा आणि तिचा मित्र विवेक हे दोघे पुण्याहून कासारसाई परिसरामध्ये पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर पुण्याच्या दिशेने परतत असताना मारुंजी परिसरात आले असता मागून त्यांना आरएमसी ट्रकने धडक दिली. या धडकेत दुचाकी वरील रिदा खाली पडली व तिचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ हिंजवडी पोलिसांनी आरएमसी ट्रकचा चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक केली असून त्याच्यावरती हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. वारंवार आरएमसी ट्रक मुळे होणाऱ्या अपघातांमुळे पोलीस प्रशासन आता काय कठोर भूमिका याबाबत घेणार हे पाहणे देखील आता महत्त्वाचा असणार आहे.

