गावगाथा

ठळक बातम्या

प्रभाग क्रमांक ११ अ आणि ११ ब मध्ये उमेदवार महेश इंगळे व सहकाऱ्यांचा जोमाने प्रचार

प्रभाग क्रमांक ११ अ आणि ११ ब मध्ये उमेदवार महेश इंगळे व सहकाऱ्यांचा जोमाने प्रचार
(श्रीशैल गवंडी, दि.२३/११/२५.अ.कोट)
अक्कलकोट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.११ चे उमेदवार महेश इंगळे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ११ अ आणि ११ ब मध्ये उमेदवार महेश इंगळे व सहकाऱ्यांचा जोमाने प्रचार सुरु आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, प्रभागातील सह उमेदवार आरती गायकवाड यांच्यासह आपल्या प्रचार कार्याचे व्यवस्थापन आपले सुपूत्र प्रथमेश इंगळे व कार्यकर्त्यांसोबत महेश इंगळे यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून अत्यंत कार्यकुशलतेने हाताळताना दिसत आहेत. प्रभागातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते संबंध, दांडगा लोकसंपर्क, मजबूत संघ व्यवस्थापान, एकात्मिक भावना, सृजन व्यक्तीमत्व व दयाभाव या बाबी त्यांच्या राजकीय जीवन वाटचालीतील जमेची बाजू आहे.

केवळ इलेक्शन व प्रचार काळातच त्यांचा प्रभागातील नागरिकांशी संपर्क येतो असे नाही. ते सातत्याने प्रभागातील व अक्कलकोट शहरातील नागरिकांशी नेहमीच संपर्कात असतात. अनेक नागरिकांच्या अडीअडचणी समस्या आस्थेने जाणून घेतात व नेहमीच मदतीला धावतात, त्यामुळे प्रभागातील नागरिकांसाठी ते नेहमीच लाडके नेते व श्रद्धास्थान राहीले आहेत, त्यामुळे यंदाही सलग पाचव्या टर्म मधून महेश मालक इंगळे हे नक्कीच निवडून येथील व इतिहास रचतील असा विश्वास प्रभागातील जेष्ठ जाणकार नागरिक व्यक्त करीत आहेत. यावेळी या प्रचार कार्यात महेश मालक इंगळे यांच्या समवेत प्रथमेश इंगळे, सुरेश कुंभार, धोंडाप्पा कुंभार, महेश काटकर, गजू काटकर,
ऋषिकेश लोणारी, श्रीनाथ पराणे, संतोष पराणे, बाबा सुरवसे, चंद्रकांत सोनटक्के, सागर गोंडाळ, भिमा मिनगले, खाजप्पा झंपले, प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, सचिन दुर्गे, धर्मा गुंजले, लखन झंपले, गोटू माने, भीमा माने, मनोज इंगोले, रमेश शिंदे, शंकर मिनगले, आप्पाशा मिनगले, रवी मलवे, सुनील नाईकवाडी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, संतोष अप्पू पराणे, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, शिवशरण अचलेर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – प्रचार कार्यात महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, यांच्या समवेत सहकारी व कार्यकर्ते दिसत आहेत.