कल्याणशेट्टी महाविद्यालयाकडून जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम
अक्कलकोट :
संयम पाळा एड्स टाळा, माहितीचा प्रकाश एड्सचा नाश, एड्स बद्दल बोला गैरसमज टाळा, एच आय व्ही ला रोखूया निरोगी समाज घडवूया आदी घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते जागतिक एड्स दिनानिमित्त कल्याणशेट्टी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या जागृती रॅलीचे
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयापासून हन्नूर चौक, एसटी स्टँड, कारंजा चौक मार्गे श्री स्वामी समर्थ मंदिरापर्यंत जागृती रॅली काढून एड्स रोगाविषयी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी रॅली मार्गावर जोरदार घोषणा देऊन नागरिकांचे प्रबोधन केले.
रॅलीचे नियोजन कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार, प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले
प्रारंभी एड्स या महाभयंकर रोगाबद्दल विज्ञान विद्याशाखेकडील प्रा हर्षदा गायकवाड यांनी माहिती दिली. सूत्रसंचलन प्रा मनीषा शिंदे यांनी केले, आभार प्रा राजशेखर पवार यांनी मानले. रॅलीमध्ये प्रा सौरभ भस्मे, प्रा शिल्पा धूमशेट्टी, शितल फुटाणे, भीम सोनकांबळे यांच्यासह रा से यो स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, ज्युनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी कौतुक केले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली काढण्यात आली त्या प्रसंगी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी
More Stories
ब्रेकिंग! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी
कृपासिंधू सोशल फाउंडेशन कडून अस्थिव्यंग व मतिमंद निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार शालींचे वाटप……..
बासलेगावमध्ये श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : ३ ते ५ डिसेंबर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल