अक्कलकोट : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार—विद्यार्थ्यांचा दमदार सहभाग

अक्कलकोट : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार—विद्यार्थ्यांचा दमदार सहभाग
अक्कलकोट ● येथील फत्तेसिंह क्रीडांगणावर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे लहान गट प्राथमिक शाळांतील मुला-मुलींसाठी आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या.
सकाळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी क्रीडांगणाची पूजा करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दृढनिश्चय, प्रामाणिक खेळ आणि पुढील जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. दिवसभर मैदानावर उपस्थित राहून त्यांनी विजेत्या संघांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविले.

स्पर्धेचे नियोजन विस्ताराधिकारी सोमशेखर स्वामी यांनी सुरळीत रीतीने करत संपूर्ण स्पर्धा यशस्वी केल्या. तालुका हायस्कूलमधील क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले, तर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.
स्पर्धांमध्ये 100 मीटर, 200 मीटर धावणे आणि बुद्धिबळ हे वैयक्तिक खेळ होते, तर लंगडी, खो-खो आणि कबड्डी या संघ खेळांमध्ये मुला-मुलींच्या संघांनी दमदार कामगिरी केली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पदके व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडपत्रे वितरित करण्यात आली.
महत्वाचे निकाल
लंगडी
• मुली – मैसलगी कन्नड शाळा
• मुले – लोहारा वस्ती शाळा, करजगी
खो-खो
• मुले – विजेते: शावळ मराठी शाळा
उपविजेता: कन्नड शाळा, मींदरगी
• मुली – कोर्सेगाव मराठी शाळा
कबड्डी
• मुले – जेवूर कन्नड शाळा
• मुली – चिंचोली (नि.) मराठी शाळा
वैयक्तिक स्पर्धा
• 100 मीटर धावणे – आकाश कांबळे (बाबलदा कन्नड शाळा), साक्षी (जेवूर इब्राहिमपूर मराठी शाळा)
• 200 मीटर धावणे – मुलगे: गुरय्या स्वामी (अंकलगे कन्नड शाळा), मुली: सविता खिलारी (नागणसुर मराठी शाळा)
• बुद्धिबळ – यश बंदिछोडे व लक्ष्मी माळी (साफळे मराठी शाळा)
चौथीतील सोमनाथ हसरमनी याने 100 मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शिक्षक नेते वीरभद्र यादवाड, बसवराज खिलारी, देविदास वागमोडे, प्रेमदास राठोड, शिवानंद गोगाव, गणेश अंबुरे, सुजित पाटील यांच्यासह अनेक शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.
६ डिसेंबर रोजी मोठा गट मुला-मुलींच्या स्पर्धा याच मैदानावर होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अरबाळे यांनी दिली.



