गावगाथा

प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने इज्तेमाई शादीया ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

सामूहिक विवाह सोहळा

प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने इज्तेमाई शादीया ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.
अक्कलकोट : (प्रतिनिधी) प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने इज्तेमाई शादीया मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे २रे वर्ष असुन इज्तेमाई शादीया सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला आहे.
दि ३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६:३० वाजता हा विवाह सोहळा टिनवाला फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता, या इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ११ वधू-वरांचा लग्न लावण्यात आले या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यास आलेलेल्या नातेवाईकांना आणि सर्व नागरिका साठी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर टिनवाला फंक्शन हॉल येथे जेवणाची व पाण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली होती.
या सामुदायिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात ११ जोडप्यांना निकाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट आयोजकांच्या वतीने कपाट, गादी, पलंग तसेच संसार उपयोगी साहित्य, वर – वधू यांना कपडे, वधूसाठी मणी मंगळसूत्र व आलेल्या पाहुण्यांना जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
इज्तेमाई शादीया सामुदायिक विवाह सोहळा हाफिज व कारी सय्यद अब्दुल रऊफ पीरजादे कादरी साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात
प्रमुख उपस्थिती,प्रमुख मान्यवर मुफ्ती अमजद अली काजी सोलापूर,शब्बीर मौलाना (सोलापूर),अन्वर पाशा पिरजादे, अशपाक भाई बाळोरगी, सद्दाम शेरीकर, मल्लिकार्जुन पाटील, इरफान दावना, हाजी अजीज शेख सर, एजाज बाळोरगी, शकूर शेख, दाता बाळोरगी,मूर्तूज बाजे,मौला पठाण,शाकीर पटेल,युसुफ बागलकोटे,अखिल मुजावर,सोहेल फरास,मुस्तफा बाळोरगी,रशीद खिस्तके,खाजा हुसेन हाफिज मैंद्रगी, अनिस हाफिज,इब्राहिम मौलाना,सरफराज मौलाना,हाफीज इस्तियाक, हाफीज अक्रम,मौलाना इर्शाद रजा,आसिफ जमादार आदीसह उपस्थित होते.
इज्तेमाई शादीया सामुदायिक विवाह सोहळ्यास आवर्जून राहिल्याबद्दल प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट चे हाफिज व कारी सय्यद अब्दुल रऊफ पीरजादे कादरी साहेब यांनी सर्वांचे आभार मानले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अजीज शेख सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button