श्री वटवृक्ष मंदीरात महेश इंगळे यांच्या हस्ते “स्वामी मौन लहरी” अल्बमचे प्रकाशन.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.०७/१२/२५)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात “स्वामी मौन लहरी” या नुतन अल्बमचे प्रकाशन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी भक्तांच्या प्रत्यक्ष अनुभुतीतुन रचून साकारलेल्या “स्वामी मौन लहरी” या भक्तीमय अल्बम मध्ये
स्वामींची प्रतिमा, अंत लागेना रे समर्था, भिऊ नकोस रे, मै गया नही जिंदा हुँ व स्वामी मौन लहरी ही पाच भक्तीगीते अर्थात अभंग प्रसारीत करण्यात आली आहेत. ही भक्तीगीते श्री स्वामी समर्थ भक्तांच्या सेवेसाठी यु ट्युब, स्पॉटिफाय, जिओ सावन व अमेझॉन म्युझिक या विविध प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करण्यात आले आहेत असे सांगून प्रसारीत केलेली सर्व भक्तिगीते ही श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये नक्कीच नवचैतन्य निर्माण करतील असेही मत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व्यक्त केले. या अल्बमच्या अनावरण प्रसंगी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, अरविंद पाटील, प्रकाश सासवडकर, धीरज जामखेडकर, जगदिश भालेराव, मोनाली नारखेडे, अद्वैत डावरे, सुरेश क्षीरसागर, नरेंद्र कुलकर्णी, अतुल डावरे, विष्णू खांडबहाले, राजेश काश्मिरे, सुरेश वाढवणे आदींसह अनेक स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री वटवृक्ष मंदीरात “स्वामी मौन लहरी” या अल्बमचे प्रकाशन करताना महेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, जगदिश भालेराव, मोनाली नारखेडे, अद्वैत डावरे, सुरेश क्षीरसागर व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!