वायरल बातमी

कब सुधरेगा रे सोलापूर हमारा..! कब उडेगा रे विमान यहॉं से..!!

सोलापूर मध्ये विमान सेवा कधी सुरू होणार .!

*सोलापूर ‌…. ?!*

कब सुधरेगा रे सोलापूर हमारा..!
कब उडेगा रे विमान यहॉं से..!!

पंढरपूर चा विठोबा..
तुळजापूरची तुळजाभवानी..
अक्कलकोटचे स्वामी समर्थ..
शहरातीलच सिद्धरामेश्वर..
गुलबर्गातील दत्त मंदिर..
हनुमान जन्मभूमी श्रीक्षेत्र कुगांव (करमाळा)..
वरीलपैकी देवांचे कोट्यावधी भक्त जगाच्या पाठीवर विखुरलेले..! यांना एकत्र येण्यासाठी एकमेव ठिकाण..
सोलापूरच.

पण त्यांना सोलापुरात आणण्यासाठी एक ही विमान नाही..!?

कैसा सुधरेगा रे सोलापूर हमारा..!

तसं बघितलं तर जागतिक ओळख आहे सोलापूरची..!
भक्तांची भूमी.. पूर्वीपासूनच…

टेक्स्टाईल विभाग के क्या कहने..!
पुरी इंडिया को सोलापुरी चादर पसंद है..!
फक्त चादरच नाही..
सोलापुरी टॉवेल, बेडशीट्स जगात भारी..!

बिनधास्त मनमोकळ्या लोकांचे शहर..!
खवय्यांची नगरी..!
कोल्हापूर पेक्षा जास्त तिखट मिरच्यांची व्हरायटी..
सोलापुरी शिक खाल्लाव का नाही..?
सोलापुरी शेंगा चटणीची चव प्रत्येकालाच माहिती..!
जगाच्या पाठीवर बनणारा लज्जतदार दालच्या खाना फक्त इथेच..!
नाव आंध्र पण सोलापुरातीलच भजी.. आंध्र भजी..!
स्पेशल पुण्या मुंबईहून येणारे पाणीपुरी प्रेमी फक्त सोलापुरातच येतात..! डोळ्यात पाणी आणणारी, झणझणीत पण लज्जतदार.. इथली पाणीपुरी..!
अख्खा चायना खवय्या मार्केट पार्क स्टेडियम शेजारी बसलेला..!
खास सोलापूरी तडका चायनीज..!
शिक कढाई व बिर्याणीची कर्मभूमी..!
चहा प्रेमींसाठी प्रत्येक ठिकाणी आवडते ठिय्ये..!
ही आहे लज्जतदार सोलापूरची ओळख..!

सोलापूर के लोगां बहोत मिठे..!
कैको तो..
शक्कर खा-खा के…
महाराष्ट्रामधील सर्वात जास्त साखर कारखाने सोलापुरातच..!

पैसे हमारी एम.आय.डी.सी भी बहुत जोशीली है..!
कॅमशाफ्ट, महत्त्वाचे केमिकल्स बनवणारी..!

हत्तरसंग कुडल परिसरातील भीमा-सिनेचा रम्य संगम..
नवव्या शतकातील हेमाडपंती प्राचीन मंदिर..!
हनुमानाची जन्मभूमी असलेले श्री क्षेत्रकुगांव (करमाळा)..
उजनी बॅक वॉटर परिसरातील.. टुरिस्ट स्पॉट्स.. कोकरे आयलँड..!

पण दुविधा ये है..
हमारी यहॉं सोलापूर मे झट पोहोचणे को.. विमानाच नही.
कोई कित्ता भी भारी रहने दो..
उसको रोड या रेल्वेसेच आना पडता..!

भलेही आता स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष होत आलीत..
थेट जागतिक आवक जावक नसल्यामुळे इथली तरुणाई दुसऱ्या मेट्रोसिटीकडे वळली..!
सोलापुरात शिकतात..
पुण्या-मुंबई, बेंगलोर मध्ये सेटल होतात..
हे वास्तव.
एकच कारण..!
सोलापूर अजून जगाशी जोडला गेलेला नाही..!!
हा दोष प्रशासनाचा..?
का,
इथल्या लोकप्रतिनिधींचा..?
ज्यांनी सोलापूरला कायम मागासलेले ठेवले.
ठेवत आहेत.. कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत..!!?
सोलापुरी पुढील पिढी सोलापुरात स्थायिक होईल का..?
स्थायिक झाली.. तरी त्यांना रोजगार मिळेल का…?
रोजगार जरी मिळाला, त्यातून तितके उत्पन्न मिळेल का..?!!

सोलापुरात कायम सुविधांचा अभाव आजपर्यंत अनुभवला..
कारण सोलापूरला सशक्त बनवण्याचे प्रयत्नच नाही..!
सध्या सगळीकडे डिजिटलायजेशन झालंय…
पण प्रशासन मात्र ठिम्म पडलंय..!
७६ वर्ष होत आलीत परंतु एक सुसज्ज विमानतळ नाही..!?
त्याबाबतची एक ही फाईल पुढे हालत नाही..?
शहर सुधारलं तर प्रशासनाला देखील भरपूर कर परतावा मिळेलच..!
ये प्रशासन के हित में जारी..!
बाकी अब आपच देखलो..!

© Subodh R Sutkar

सुबोध रमेश सुतकर
जनसेवा शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य.
मो- 9503221222

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button