दोन हजाराची नोट बंद, तुमच्याकडे असेल तर घाबरू नका, फक्त हे काम करा
२ हजार रुपयांची नोट बदलवण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत असली तरी ही नोट चलनात कायम राहणार आहे.
दोन हजाराची नोट बंद, तुमच्याकडे असेल तर घाबरू नका, फक्त हे काम करा
‐——–
नवी दिल्ली : सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा जवळपास सर्वांवर परिणाम होणार आहे. यापुढे २००० रुपयांच्या नोटेची छापाई रिझर्व्ह बँक करणार नाही. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तुमच्याकडे दोन हजार रुपयांची नोट असेल तर काय कराल? याबाबत रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना सचूना देत माहिती जारी केली आहे.रिझर्व्ह बँकेने एक पत्रक जारी करत दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. पण ही नोट चलनात कायम राहील, असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. २०१६ मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये नोव्हेंबरमध्ये ही २००० रुपयांची गुलाबी नोट चलनात आली होती. नोटेची छपाई २०१८-१९ पासून बंद२ हजार रुपयांच्या नोटेची छपाई जवळपास ४ ते ५ वर्षांपासून बंद आहे. ही नोट रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या अनुच्छेद २४(१) नुसार चलनात आणण्यात आली होती. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर चलनातील मागणी भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट आणली होती. ५००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्यानंतर २ हजार रुपयांच्या नोटेचा उद्देश संपला होता. २००० रुपयांच्या नोटेची छपाई ही २०१८ – १९ मध्येच बंद करण्यात आली होती. बँकेत जाऊन बदलवा नोटतुमच्याकडे २ हजार रुपयांची नोट असेल तर घाबरू नका. ज्या नागरिकाकडे ही नोट असेल त्याने आपल्या बँक खात्यात ती जमा करावी. किंवा बँकेत जाऊन २००० रुपयांची नोट बदलवू शकता. कुठल्याही बंधनांशिवाय सामान्यपणे ही नोट बँक खात्यात खातेदार जमा करू शकतो. २३ मेपासून नोट बदलवता येणार २००० रुपयांची नोट बँकेत जाऊन बदलवता येणार आहे. २३ मेपासून म्हणजे येत्या मंगळपासून ही नोट नागरिकांना बँकेत जाऊन बदलवता येणार आहे. पण बँकेतील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सध्यातरी एकावेळी फक्त २० हजार रुपयेच जमा करता येणार आहेत, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. २००० रुपयांची नोट बदलवण्याची मुदतही रिझर्व्ह बँकेने दिली आहे. ३० सप्टेंबर २०२३पर्यंत बँकांना २००० रुपयांची नोट जमा करता येईल किंवा बदलवून देता येईल, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरनंतरही २ हजाराची नोट चलनात राहणारनिर्णय जाहीर होताच रिझर्व्ह बँकेने नागरिकांना आवाहन केलं आहे. नागरिकांनी घाबरू नये, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. २ हजार रुपयांची नोट बदलवण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत असली तरी ही नोट चलनात कायम राहणार आहे. नागरिकांना बँकेतून नोट बदलवून घेण्यासाठी ४ महिने पुरेसे आहेत. २ हजार रुपयांच्या बहुतेक नोटा या ३० सप्टेंबरपर्यंतच्या दिलेल्या मुदतीत परत होतील, अशी अपेक्षा आहे. ही सामन्या प्रक्रिया आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलं असल्याचं वृत्त ANIने दिलं आहे.