पुणेरी “अक्कलकोटकरांचा” स्नेह मेळावा उत्साहाने संपन्न.. बसवेश्वर मित्र मंडळ पुणे आयोजित वेळ अमावास्या स्नेहभोजनास प्रचंड प्रतिसाद
अक्कलकोट तालुक्यातील पुण्यातील मंडळीनी प्रचंड प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात सुमारे चार हजार नागरिकांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.

पुणेरी “अक्कलकोटकरांचा” स्नेह मेळावा उत्साहाने संपन्न.. बसवेश्वर मित्र मंडळ पुणे आयोजित वेळ अमावास्या स्नेहभोजनास प्रचंड प्रतिसाद

पुणे – बसवेश्वर मित्र मंडळ पुणे आयोजित वेळ अमावास्या स्नेहभोजन कार्यक्रमाला अक्कलकोट तालुक्यातील पुण्यातील मंडळीनी प्रचंड प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात सुमारे चार हजार नागरिकांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,अक्कलकोट भाजप शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महाराष्ट्र सरपंच परिषद सोलापूर जिल्हा समन्वयक सौ वनिताताई सुरवसे ,अॅड कोतमिरे यांच्या सह विविध मान्यवरांनी भेट दिली व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी आयोजकांना असेच गोडीगुलाबीने मिळुन मिसळून राहत एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या व भाजप अक्कलकोट च्या वतीने जोजन यांनी आयोजकांचे फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, अँड अमित कोतमिरे यांनीही शाल श्रीफळ देऊन गौरव केला.
स्नेहभोजन कार्यक्रमात वेळ अमावस्या निमित्ताने बनवले जाणारे सर्व पदार्थ कडबा भजी, खीर, चटणी, आंबील, ज्वारी बाजरीच्या कडक भाकरी,चपाती, वेगवेगळ्या भाज्या यांचे समावेश होता. ह्यात सुमारे 4 हजार नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.यंदा नागरिकांना चांगल्या प्रकारे आसनव्यवस्था व मोठ्या हाॅल उपलब्ध झाल्याने चांगली सोय झाली.
तसेच मराठी कन्नड भजन व सांस्कृतिक कार्यक्रमास पुणेरी अक्कलकोट करांनी प्रतिसाद दिला.
प्रत्येक अक्कलकोट तालुक्यातील कामधंदा व्यवसायासाठी आलेले पुणेकर आपल्या हक्काची माणसं एकत्र आल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतो.
उत्तम ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन यावेळी झाले.चांगले नियोजन भोजन अवस्था केल्या बदल प्रत्येकजण श्री बसवेश्वर मित्र मंडळ मार्केट यार्ड याचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त करत होते.
