अक्कलकोट मध्ये रंगणार स्पर्धाडॉजबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू, सॉफ्ट फुटबॉल नऊ गटांच्या राज्यस्तरीय स्पर्धा.
-
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर जिल्हा क्रिडा असोसिएशनचे उपक्रम.
महेश इंगळे यांच्या वतीने खेळाडूंच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था.
(श्रीशैल गवंडी, दि.०८/१२/२५.अ.कोट)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर जिल्हा सॉफ्ट फुटबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू व डॉजबॉल क्रिडा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सब जुनियर, ज्युनियर व सीनियरअशा ४ खेळांच्या मुले व मुली आणि पुरुष व महिलांच्या नऊ गटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक ९ ते ११ डिसेंबर दरम्यान येथील राजे फत्तेसिंह मैदान येथे आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सचिव व सॉफ्टफुटबॉल खेळाचे जनक प्रा.संतोष खेंडे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील सुमारे १००० खेळाडू पंच, पदाधिकारी, प्रशिक्षक व्यवस्थापक, जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाचे तीन तीन मैदान तयार केलेले आहेत. या स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष महेश इंगळे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा.नगरसेवक मिलनदादा कल्याणशेट्टी, युवा नेते प्रथमेश इंगळे अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे बक्षीस समारंभ सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या दिव्य सान्निध्यात संपन्न होईल. यावेळी माजी नगरसेवक सी.ए.विनोद भोसले, सॉफ्टबॉलचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सॉफ्टफुटबॉलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजिनाथ हत्तुरे, पेट्यांक्यूचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन राठोड, टेनिस हॉलीबॉलचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी, राज्य संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्रा.नंदकिशोर देशपांडे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील सर्व खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था ही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेचे आयोजन व नियोजन जिल्हा सचिव व सॉफ्टफुटबॉल खेळाचे जनक प्रा.संतोष खेंडे, उपाध्यक्ष वसीम शेख, खजिनदार गंगाराम घोडके, परमेश्वर व्हसुरे, संचालक श्रीधर गायकवाड, रवींद्र चव्हाण, प्रबुद्ध चिंचोलीकर, इकबाल दलाल, संतोष पाटील, प्रशांत कदम, सिताराम भांड, सागर जगझाप हे करीत आहेत, तरी नागरकांनी व क्रिडाप्रेमींनी या खेळांच्या माध्यमातून खेळाडूंचा खेळ पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहनही प्रा.संतोष खेंडे यांनी केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!