मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी योगदान द्यावे ;मल्लिनाथ कल्याणशेट्टी
सौ सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा
अक्कलकोट :
मुले मेरिटमध्ये यावीत, डॉक्टर इंजिनियर व्हावीत, स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण होऊन अधिकार पद प्राप्त करावे अशी कुटुंबीयांची इच्छा असते, ही ध्येय साध्य करण्यासाठी पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित सौ सुरेखा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी आयोजित केलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्युनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग सुरू आहे. दूरचित्रवाणी, मोबाईल, व्हाट्सअप,फेसबुक आदी सुविधांमध्ये पालक व्यस्त आहेत. मुलांच्या माता कुटुंबीय टीव्हीवरील सिरीयल पाहण्यात दंग असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची पीछेहाट सुरू आहे ती रोखण्यासाठी कुटुंबातील सर्वांनी सामुदायिकपणे प्रयत्न केले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्वल होईल.
प्रारंभी प्रा सलोनी शहा यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मेळाव्यात पालक बशीर बागवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी वैजनाथ कोरे, ज्योती करजाळे, सारिका झिंगाडे, मनोज जाधव, मुक्ता चव्हाण, शिवाजी कवाडे, मारुती जगताप, विलास देशमुख, सिद्धाराम कुंभार, समीना शेख, अनिता कांबळे, दिपाली मोरे, सरस्वती त्रिगुळे, श्रीशैल सुरवसे, विद्याधर शिमगे, भीमाशंकर कामाटी, बाळू भडोळे, बशीर बागवान, विनोद कटारे, सुजाता भिकमाळी, राम वसुळे, सविता टाके, उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा शिवकुमार मठदेवरू यांनी केले, सूत्रसंचलन प्रा गुरुशांत हपाळे यांनी केले तर आभार प्रा शिल्पा धूमशेट्टी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापिका मधुबाला लोणारी, लक्ष्मण लिगाडे, हर्षदा गायकवाड, शितल फुटाणे, शितल टिंगरे, विजयलक्ष्मी वाले यांनी प्रयत्न केले
फोटो ओळ
कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या पालक मेळाव्याप्रसंगी मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!