मराठबोली पुणे आयोजित राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे : मराठी बोलीभाषा, लोकसंस्कृती व ग्रामीण साहित्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठबोली पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांतील नामवंत दिवाळी अंकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विभाग अंतर्गत अर्थवाणी (मुंबई), समतोल, रस्ता संवाद, आनंद तरंग (पुणे), गावगाथा (सोलापूर) व चिंतन या दिवाळी अंकांना क्रमांक प्राप्त झाला आहे.
द्वितीय क्रमांक विभाग मध्ये लोकनिर्माण, घरघंटी, पत्रकार दर्पण, शिवतेज व दयावर्ती यांचा समावेश आहे.
तृतीय क्रमांक विभाग अंतर्गत उद्गार वास्तव, विवेचन, पुनवा व पल्लवी परिसर या दिवाळी अंकांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय सातत्यपूर्ण उच्च दर्जाचे दिवाळी अंक निर्मितीसाठी विशेष सन्मान जाहीर करण्यात आला असून विचार पारिजातक, अंतर्नाद प्रतिबिंब, सृजन संवाद, निसर्ग संवाद व किरण कथा या दिवाळी अंकांना हा मान देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री. शरद अणे सर, सौ. विद्या घोरे परांडे व सौ. अपर्णा बोते यांनी काम पाहिले. यंदाच्या दिवाळी अंक स्पर्धेत एकूण ३५७ दिवाळी अंकांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती देण्यात आली.
मराठी साहित्य, बोलीभाषा आणि ग्रामीण संस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमाबद्दल साहित्यवर्तुळातून समाधान व्यक्त होत असून, निवड झालेल्या सर्व दिवाळी अंकांचे मराठबोली पुणेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!