पिंपरी -चिंचवडमध्ये भाजपची मोठी खेळी ; अनेक दिग्गजांचा भाजपात प्रवेश ; यादी पाहून विश्वास बसणार नाही…

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पक्षांना मास्टर स्ट्रोक दिला आहे. आज मुंबईत अजित पवार गटाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक दिग्गजांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यात माजी महापौर, माजी महापौरांच्या मुलासह, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौरांचा ही समावेश आहे.
भाजपच्या या मास्टर स्ट्रोक मुळे निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी पूर्णपणे बॅकफूटवर गेली असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.
माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश..
1) संजोग वाघेरे – शहराध्यक्ष, ठाकरे गट
2) उषा वाघेरे – माजी स्थायी समिती अध्यक्षा, अजित पवार गट
3) प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर, अजित पवार गट
4) प्रशांत शितोळे – माजी अध्यक्ष, स्थायी समिती – अजित पवार गट
5) नवनाथ जगताप – माजी अध्यक्ष, स्थायी समिती (शरद पवार गट)
6) राजू मिसाळ – माजी उपमहापौर, अजित पवार गट
7) समीर मासुळकर – माजी नगरसेवक, अजित पवार गट
8) रवी लांडगे – भाजपचे माजी नगरसेवक ( सध्या ठाकरे गट )
9) जालिंदर शिंदे – माजी नगरसेवक, अजित पवार गट
10) अमित गावडे – माजी नगरसेवक, ठाकरे गट
11) संजय काटे – माजी अपक्ष नगरसेवक, महायुतीचे कार्यकर्ते
12) मीनल यादव – माजी नगरसेविका, ठाकरे गट
13) कुशाग्र कदम – मुलगा, माजी महापौर मंगला कदम
14) प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक, अजित पवार गट
15) विनोद नढे – माजी नगरसेवक, अजित पवार गट
16) सचिन सानप – युवा सेना जिल्हाप्रमुख
17) आशा सूर्यवंशी – राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेविका
18) प्रवीण भालेकर माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस
19) सद्गुरू कदम – माजी नगरसेवक, काँग्रेस
20) श्री दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)
21) डॉ. श्री सुहास कांबळे
22) श्री अशोक मगर
23) श्री नागेश गवळी
24) दिनेश नढे
25) बिपिन नानेकर



