स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार कार्यात इंगळे कुटुंबियांचे अमूल्य योगदान – मा.आ. राजन पाटील
(श्रीशैल गवंडी,अ.कोट, दि.२३/१२/२५)
येथील श्री वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे असंख्य भक्त संपूर्ण देशभर व विदेशातही आहेत. स्वामी दर्शनाकरिता येथे येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना उत्तम स्वामी दर्शनाचं नियोजन व व्यवस्था हे वटवृक्ष मंदिरातील खास वैशिष्ट्य आहे. मंदिर समितीच्या या कार्यात प्रथमेश इंगळे यांच्या माध्यमातून
इंगळे कुटुंबीयांची चौथी पिढी स्वामी सेवेत कार्यरत आहे. गतकाळात देवस्थानचे माजी चेअरमन व प्रथमेश इंगळे यांचे आजोबा कै.कल्याणराव इंगळे यांनी स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्याची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर महेश इंगळे व प्रथमेश इंगळे हे आपल्या असंख्य जनसंपर्काच्या माध्यमातून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व अक्कलकोटचे नाव जागतिक स्तरावर उज्वल करीत स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्य विस्तारित करण्याचे गौरवस्पद कार्य करीत आहेत, त्यामुळे स्वामी भक्तीच्या प्रचार प्रसार कार्यात इंगळे कुटुंबीयांचे अमूल्य योगदान असल्याचे मनोगत मोहोळ तालुक्याचे माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे नेते राजन पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांनी मा.आ.राजन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी कमलताई पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मा.आ.राजन पाटील बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, मोहन जाधव, प्रसाद सोनार, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – मा.आ.राजन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी कमलताई पाटील यांचा सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!