गावगाथा

विनयशील व्यक्तीमत्वामुळे महेश इंगळे हे धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धुरंधर – मा.आमदार राजन पाटील

भाजपा नगरसेवक महेश इंगळे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देवून मोहोळचे मा.आमदार तथा भाजपाचे नेते राजन पाटील यांनी व्यक्त केले मनोगत.

विनयशील व्यक्तीमत्वामुळे महेश इंगळे हे धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील धुरंधर – मा.आमदार राजन पाटील
भाजपा नगरसेवक महेश इंगळे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देवून
मोहोळचे मा.आमदार तथा भाजपाचे नेते राजन पाटील यांनी व्यक्त केले मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२३/१२/२५)
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा अक्कलकोट नगरपरिषद निवडणूकीतून प्रभाग क्र. ११ ब मधून सलग पाचवेळा निवडून आलेले लोकप्रिय नगरसेवक महेश इंगळे हे त्यांच्या विनयशील व्यक्तीमत्वामुळे खऱ्या अर्थाने धार्मिक, सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील धुरंधर असल्याचे प्रतिपादन मोहोळचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते राजन पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या विजयाचे औचित्य साधून इंगळे यांच्या संपर्क कार्यालयास सदीच्छा भेट दिली. यावेळी नगरसेवक महेश इंगळे यांनी मा.आमदार राजन पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मा.आ.राजन पाटील बोलत होते. पुढे बोलताना मा.आ.राजन पाटील यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात येणाऱ्या असंख्य भाविकांसह राज्यभरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे त्यांच्या अंगी असलेले कसब व प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या बहूआयामी व्यक्तीमत्वाची साक्ष देतात. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेवक पदाच्या माध्यमातून ते लोकसेवेसोबतच येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी आणखीन जलद व सुलभ स्वामी दर्शनाची सोय उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करून महेश इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी युवा नेते प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत,
सागर गोंडाळ, मनोज जाधव, गणेश इंगळे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सुनिल पवार, शरण मठाचे विश्वस्त बसवराज आलमद, मधुकर सदाफुले, समर्थ स्वामी, शंकर मलवे, ज्ञानेश्वर भोसले आदींसह महेश इंगळे, प्रथमेश इंगळे मित्र परिवारचे अन्य सदस्य व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – मा.आ.राजन पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button