अक्कलकोट व मैंदर्गीतील नूतन लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार
📍 सोलापूर | प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील अक्कलकोट व मैंदर्गी नगरपरिषदेतून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पालकमंत्री मा. श्री. जयकुमारजी गोरे यांच्या हस्ते भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. या वेळी जनतेने दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, दोन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

या सत्कार समारंभास विजयाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे अक्कलकोटचे आमदार श्री. सचिन दादा कल्याणशेट्टी हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना शहर विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व जनहिताच्या योजनांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत, अक्कलकोट व मैंदर्गी शहरात जनहितकारी व विकासाभिमुख कार्याला गती देण्याचा संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार श्री. देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, श्री. प्रदीप पाटील, श्री. शिवशरण जोजन, श्री. प्रविण शहा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!