गावगाथा

अन्नछत्र मंडळात धार्मिकतेसोबत पर्यावरण व समाजोपयोगी कार्य उल्लेखनीय – डॉ. पंकज भोयर 

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अन्नछत्र मंडळात धार्मिकतेसोबत पर्यावरण व समाजोपयोगी कार्य उल्लेखनीय – डॉ. पंकज भोयर
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यासोबतच समाजोपयोगी व पर्यावरण संवर्धनाच्या विविध योजना राबविल्या जात असून, अन्नछत्र मंडळाच्या परिसरात वसुंधरेची जपणूक होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे गृह (ग्रामीण), सहकार, शिक्षण, गृहनिर्माण व खनीकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काढले.
डॉ. पंकज भोयर हे सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे दर्शनासाठी आले असता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे डॉ. भोयर यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास न्यासाचे एस. के. स्वामी, धानप्पा उमदी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, मुन्ना कोल्हे, पप्पू कोल्हे, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, शिव स्वामी, कुमार सलबत्ते, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button