
HTML img Tag
HTML img Tag
सामाजिक बांधिलकी जपणारे अन्नछत्र मंडळ भोसले कुटुंबियांचे नेहमीच मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत आहे ; रिजन चेअरमन अॅड. श्रीनिवास कटकुर
अक्कलकोट: (प्रतिनिधी)
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट संचलित लायन्स शिशु विकास मंदिर व लायन्स क्बल प्राथमिक शाळेसह क्लब करिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कुटुंबियांचे नेहमीच मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्याचे मनोगत रिजन चेअरमन, रिजन -१ डिस्ट्रिक्ट ३२३४, डी-१-ला अॅड. श्रीनिवास कटकुर यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या कडून लायन्स शिशु विकास मंदिर व लायन्स क्लब प्राथमिक शाळेस जलशुद्धीकरण यंत्र देण्यात आले, या यंत्राच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून अॅड. श्रीनिवास कटकुर हे बोलत होते.

दरम्यान जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी संस्थेच्या सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व माजी नगराध्यक्षा अनिताताई अभय खोबरे, झोन चेअरमन, झोन ३, रिजन १-ला. मल्लिकार्जुन मसुती हे प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. श्रीनिवास कटकुर म्हणाले, लायन्स क्बल अक्कलकोटचे अध्यक्ष अभय खोबरे हे कार्यक्षम नेतृत्व क्लबला लाभल्याने शिशु विकास व प्राथमिक शाळा, क्लब करिता लागणाऱ्या मुलभूत सुविधा मिळत आहेत. अक्कलकोट लायन्स क्लब हे तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध कार्याच्या माध्यमातून पोहोचलेले असून अभय खोबरे यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकिर्दीत क्लबच्या माध्यमातून विविध योजना व कार्यक्रम राबविले जात असल्याने याची आंतरराष्ट्रीय क्लब देखील दखल घेतली असल्याचे सांगून, अक्कलकोट लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक अॅड. श्रीनिवास कटकुर यांनी यावेळी केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी आपल्या मनोगतातून क्लबच्या कार्याचे कौतुक करून नेहमीच विधायक कार्यासाठी क्लब च्या बरोबर भोसले कुटुंबीय व अन्नछत्र परिवार असून, नेहमीच सहकार्य राहील असे यावेळी भोसले म्हणाले.
या प्रसंगी अक्कलकोट लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. अभय खोबरे, स्कूल कमिटी चेअरमन ला. राजेंद्र हत्ते, सचिव ला. शिरीष पंडित, स्कूल कमिटी उपाध्यक्ष ला. सुभाष गडसिंग गुरुजी, खजिनदार ला. विठ्ठलराव तेली, स्कूल कमिटी सचिव ला. शिवशरण खुबा, सर्व ला. प्रभाकर मजगे, प्रकाश यादव, प्रकाश उण्णद, राजशेखर कापसे, सेन्ट्रल अध्यक्ष स्वामीराव कलशेट्टी, मल्लिनाथ साखरे, शिवपुत्र हळगोदे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी खुने, शिशु विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका महानंदा निलगार यांच्या सह लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे सर्व लायन्स सदस्य यांच्या सह अक्षता खोबरे, रोहित खोबरे, रोहित मोरे, निखील पाटील, वैभव मोरे, प्रवीण घाटगे, रमेशराव शिंदे यांच्या सह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी गण उपस्थित होते.
या प्रसंगी स्वागत अध्यक्ष ला. अभय खोबरे यांनी केले, तर प्रस्थाविक ला.राजेंद्र हत्ते, आभार ला. शिरीष पंडित आणि सूत्रसंचलन संगीता बिराजदार यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!