वायरल बातमी

१९३३ मधलं सायकलचं बिल आलं समोर, लोकं म्हणाले आता पंक्चर काढायला यापेक्षा जास्त पैसे लागतात

आजोबांच्या काळातलं सायकलचं बिल बघून तुम्हीही म्हणाल यापेक्षा जास्त तर आता पंक्चर काढायला पैसे लागतात..

१९३३ मधलं सायकलचं बिल आलं समोर, लोकं म्हणाले आता पंक्चर काढायला यापेक्षा जास्त पैसे लागतात

HTML img Tag Simply Easy Learning    

आजोबांच्या काळातलं सायकलचं बिल बघून तुम्हीही म्हणाल यापेक्षा जास्त तर आता पंक्चर काढायला पैसे लागतात..

HTML img Tag Simply Easy Learning    

५० वर्षांपूर्वी बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंची किंमत किती होती याचा कधी विचार तुम्ही केला आहे का? आपण आजोबा किंवा वयस्कर लोकांशी बोलतो तेव्हा आपल्याला कळते की पूर्वी १० ग्रॅम सोने १० रुपयांना मिळत होते. खाद्यपदार्थ १ किंवा २ पैशांना मिळत होते. कालांतराने महागाईही वाढली. आज कोणत्याही सामानाच्या किमती खूप वाढल्या आहेत. आज सोने ५ हजार रुपये प्रति ग्रॅम झाले आहे. त्याचबरोबर अशा अनेक वस्तू आता १००-२०० रुपयांना मिळतात ज्या अवघ्या काही पैशात त्याकाळी मिळायच्या.बरं, ही काळाची महिमा आहे. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने एक बिल सोशल मीडियावर शेअर केले आहे ज्यामध्ये सायकलची किंमत बघून सर्वजण जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. अनेक जण कमेंट करून त्यांनी कितीला सायकल घेतली हे कमेंट करून सांगत आहेत.हे बिल ७ जानेवारी १९३४ रोजीचं आहे. त्या काळी सायकलची किंमत फक्त १८ रुपये असायची, तेवढ्यात आज एक पंक्चरही निघत नाही. बिल समोर आल्यानंतर लोकांना जुने दिवस आठवले आहेत. हे बिल संजय खरे नावाच्या फेसबुक यूजरने शेअर केले आहे. संजयने लिहिले की, ‘एकेकाळी सायकल हे माझ्या आजोबांचे स्वप्न असायचे. काळाचं चाक सायकलच्या चाकासारखं किती फिरलंय!’
या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बरं त्यावेळी सायकलची किंमत कमी होती खरी. पण उत्पन्नही तसंच कमी होतं. प्रवीण नावाच्या युजरने कमेंटमध्ये लिहिले की, खूप जुनी आठवण आहे. जून १९३४ मध्ये माझ्या स्व. वडिलांचा जन्म झाला होता. मला नातवंडेही आहेत. १९७७ मध्ये माझ्या वडिलांनी मला हिंद-सुपर्ब सायकल रु. २४० मध्ये घेऊन दिली होती. ती खूप मजबूत सायकल होती.
या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे- एवढी स्वस्त सायकल एकेकाळी असायची. कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले आहे – खरंच, आता देश किती बदलला आहे. सध्याच्या काळात १८ रुपयांत सीटही मिळत नाही, सायकल तर खूप दूरची गोष्ट आहे.
त्याचवेळी गिरीश नावाच्या युजरने कमेंट केली, जबरदस्त! पाहून आनंद झाला. तोही काळ काय होता? याशिवाय अजय नावाच्या युजरने दावा केला की, आजच्या हिशोबाने तर सायकल खूप महाग होती. कारण तेव्हा सरकारी मेकॅनिकचा पगार १२ रुपये, मुख्य लिपिकाचा पगार २० रुपये आणि कलेक्टरचा पगार ५० रुपये होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button