गावगाथा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन आज पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार मा.श्री. रामदासजी तडस, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी खासदार अशोकअण्णा मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रविण तरडे,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, संजय केणेकर, माधवी नाईक, तसेच दिपाली सय्यद, बापू पठारे, योगेश दोडके, संदीप भोंडवे, काका पवार, विलास कथुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, हनुमंत गावडे, उद्योजक सूर्यकांत काकडे, प्रवीण बढेकर, विशाल गोखले, विशाल चोरडिया यांच्यासह कुस्ती संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, मा. नगरसेवक आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबीयांकडे या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आली. मोठ्या आनंदाने आम्ही आयोजनास सुरुवात केली आणि असंख्य मदतीचे हात पुढे आले. ४५ संघातून ९५० पेक्षा अधिक कुस्तीगीर सहभागी झाले आहेत. पुढील पाच दिवस चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महिन्द्रा थार, ट्रॅक्टर व जावा गाड्यांसह रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. कुस्तीला प्रोत्साहन देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. रामदास तडस यांनीही कुस्तीगिरांसाठी विविध मागण्या मांडल्या. राज्य सरकराने कुस्तीगिरांच्या विकासासाठी निर्णय घेण्याची मागणी यावेळी प्रास्ताविकात केली. 

प्रत्येक जिल्ह्यातील शहरातील तालीम संघातील स्पर्धकांनी देखणे संचलन यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस बँडने यावेळी मानवंदना दिली. उद्घाटनालाच कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी पाहता शेवटच्या दिवशी अंतिम कुस्ती पाहण्यासाठी किती गर्दी होईल, याचीच प्रचिती आज आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button