स्वामी दर्शनाने नुतन वर्षाचा आनंद द्विगुणित – डॉ.अमिता बिर्ला
स्वामींच्या दर्शनानंतर डॉ.अमिता बिर्ला यांचे वक्तव्य.

स्वामी दर्शनाने नुतन वर्षाचा आनंद द्विगुणित – डॉ.अमिता बिर्ला

स्वामींच्या दर्शनानंतर डॉ.अमिता बिर्ला यांचे वक्तव्य.

(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट) दि.१०/०१/२५….. आम्ही बिर्ला कुटुंबीय परप्रांतीय असून सुद्धा स्वामींच्या इच्छेनेच
यंदाच्या नूतन वर्षाच्या पूर्वार्धात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. नुतन वर्षाच्या पूर्वार्धात स्वामी दर्शनाच्या झालेल्या या लाभाने माझ्यासह संपूर्ण बिर्ला कुटुंबाला आनंद होऊन स्वामी दर्शनाने नूतन वर्षाचा आनंद द्विगुणीत झाला असल्याचे प्रतिपादन राजस्थान मधील कोटा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अमिता बिर्ला यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी डॉ.अमिता बिर्ला व कुटुंब सदस्यांचा
स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी डॉ.अनिता बिर्ला बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ. अमिता बिर्ला यांनी स्वामी समर्थ नामाच्या प्रचीतीची महिमा ऐकून स्वामीच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला येण्याची ओढ लागली होती, पण स्वामी समर्थांच्या इच्छेने या नूतन वर्षात त्यांच्या दर्शनाची ओढ व आतुरता पूर्ण झाली असल्याने जीवन सार्थक झाले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या कार्याचा व स्वामी समर्थांच्या जीवन चरित्राचा प्रथमेश इंगळे यांच्याकडून आवर्जून आढावा घेतला.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे हिंदू धर्मातील व हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थान असून भविष्यात संपूर्ण देशभरातील भाविक स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोटला नक्कीच भेट देतील असा मनोदय व्यक्त करून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी
अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, कामशेत पुण्यातील पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, संजय पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.अमिता बिर्ला यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे, तहसीलदार विनायक मगर, राजेंद्र टाकणे, श्रीशैल गवंडी व अन्य दिसत आहेत.
