गावगाथा

आळगे शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; शैक्षणिक विकासाला नवी दिशा

निवड नियुक्ती

आळगे शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; शैक्षणिक विकासाला नवी दिशा
आळगे : (प्रतिनिधी)
आळगे येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया शांततेत व एकमताने पार पडली. या निवडीत मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महातेश माळगे यांची तर उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन चालगेरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कन्नड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी परशुराम मांग यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडप्रक्रियेप्रसंगी गावचे सरपंच मानतेश हत्तुरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शरणबसप्पा माळगे यांच्यासह राजकुमार पाटील, गड्डेप्पा कोरे, संतोष चराटे, दयानंद कोरे, श्री गुरुशांत माळगे, महादेव पाटील, महेश चराटे, औधूसिद्ध पुजारी राजशेखर स्वामी, बसवराज पाटील, कलप्पा चालगेरी आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व व्यवस्थापन समिती यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, शाळेतील सोयी-सुविधा वाढवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कारक्षम वातावरण निर्माण करणे यासाठी समिती सक्रिय राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानत शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बिनविरोध निवडीमुळे गावात समाधानाचे वातावरण असून शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button