जन्मतः दिव्यांग पण सृष्टी जाणतो रेवणसिध्द फुलारी संगीत क्षेत्रात यशस्वी झेप….
प्रतिभावंत गायक रेवण फुलारी

- जन्मतः दिव्यांग पण सृष्टी जाणतो रेवणसिध्द फुलारी
संगीत क्षेत्रात यशस्वी झेप….
हात नाही पण पायाने लेखन करणारे, पाय नसताना हातावर शरिराचे भार पेलून चालणारे, मुके असून हातवारे करत समजावून सांगणारे, डोळे नाहीत पण अचूक पैसे मोजणारे अनेक लोकं आपण पाहिले असतीलच. असाच एक बालक आपल्या कर्नाटक सीमेलगत असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर गावात राहतो, जन्मतः दोन्हीं डोळ्यांनी दिव्यांग असलेला रेवणसिध्द पुंडलिक फुलारी.
दिव्यांगत्वावर मात करत तबलावादन, हार्मोनियम वादन, पॅड, कीबोर्ड, विणा आदी वाद्य वाजवण्यामध्ये कुशल असलेल्या आणि वाद्य वाजवत गायन करणारा रेवणसिद्ध फुलारी अवघ्या १४ व्या वर्षी कर्नाटक राज्यातील नंबर वन टीव्ही वाहिनी झी कन्नड वहिनीवरील कर्नाटकातील नंबर वन सिंगिंग रियालिटी शो सारेगामापा लिट्ल चॅम्प्स सीजन १९ साठी निवड होऊन संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या कौतुकास पात्र ठरत यशस्वी झेप घेतल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा समवेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील संगीत रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि जन्मतः दोन्ही डोळ्याने दिव्यांग असलेल्या कुटुंबाला कोणत्याही संगीताचे पार्श्वभूमी नसताना हाताला मिळालेल्या घागर, टोपली, बादली, ग्लास आदी वस्तूंचे वाद्य म्हणून वाजवत गावातील बँजो गाडीचे आवाज ऐकताच तिथे हजर राहून वाद्य वाजवत गायनाला सुरुवात करत असतं. संगीताचे प्रारंभ घरातून सुरुवात करून कमी कालावधीत कर्नाटक राज्यातील कन्नड झी वाहिनीवरील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या सारेगमप लिट्ल चॅम्प्स सीजन १९ साठी निवड होवून मागील आठ एपिसोड मध्ये उत्तम गायन करत सलग चार आठवड्यापासून बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द विक ,इंस्पिरेशनल सिंगर ऑफ द विक ,बेस्ट परफॉर्मर ऑफ द विक, व्हाईस ऑफ द विक असे सलग दहा हजाराचे चार पारितोषिक पटकावून कर्नाटकातील आणि देशातील संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या भुवया उंचावणारा दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विशेष करून कर्नाटक राज्यातील लोकप्रिय अभिनेते स्वर्गीय डॉ. राजकुमार घराण्यातील हॅटट्रिक अभिनेता शिवराजकुमार यांनी स्वतः व्यासपीठावर जाऊन गायनाचे कौतुक करत गीता पिक्चर्स कडून ५० हजार रुपये बक्षीस म्हणून दिल्याने नक्कीच आत्मविश्वास बळावला आहे. दिव्यांग बालकलाकार रेवणसिद्धला कर्नाटकातील फिल्म क्षेत्रातील क्षेत्रातील दिग्गज कलाकार हॅटट्रिक अभिनेता शिवराज कुमार, डी बॉस दर्शन, प्रेम, रक्षिता मॅडम, आनंद, संगीत क्षेत्रातील भीष्म पितामह नादब्रह्म डॉ. हंसलेखा, विजय प्रकाश, अर्जुन जन्या, अनुश्री तसेच इतर कॉमेडी कलाकारांचे रेवणसिद्ध आवडतं बनला आहे. तसेच रेवणसिद्ध फुलारीच कौतुक करताना दिसत आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये असंच परफाॅरमन्स देत राहिला तर रेवणसिद्ध फुलारी नक्कीच ग्रँड फिनाले पर्यंत मजल मारेल आणि त्यामध्ये पाहण्यासाठी संगीत क्षेत्रातील रसिक श्रोते उत्सुक आहे.

शब्दांकन — सिद्धार्थ खेड
