पुण्याच्या राजकारणात भूकंप, रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला
महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी

पुण्याच्या राजकारणात भूकंप, रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला
पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे पुण्यातील बडे नेते रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.पुण्याच्या राजकारणात काय सुरु आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. सातत्याने नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यतच अर्ज दाखल करता येणार आहे. पण अजूनही सत्ताधारी आणि विरोधकांचं जागावाटप ठरताना दिसत नाही. विशेष म्हणजे आज अतिशय नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणूक जाहीर झाली तेव्हाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती होईल असं जाहीर केलं होतं. पण अजूनपर्यंत तरी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. विशेष म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करुन हा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तो सुटला नाही. आता पुण्यातील शिवसेनेचे बडे नेते रवींद्र धंगेकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
रवींद्र धंगेकर हे त्यांच्या पत्नी आणि मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. पण भाजपकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने धंगेकर थेट अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र युती होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
महायुतीत काय-काय घडलं?
पुण्यात महायुतीत काय सुरु आहे? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. कारण महायुतीत जागावाटपावरुन नाराजीनाट्य रंगलेलं बघायला मिळालं. भाजपकडून शिवसेनेला केवळ 12 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी याबाबत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गऱ्हाणं मांडलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्याकडे महायुतीचे जागावाटप ठरवण्याची जबाबदारी दिली



