गावगाथा

*सोलापूर येथे सोनार समाजाचा ऐतिहासिक मेळावा उत्साहात संपन्न; विविध पुरस्कार व गुणगौरव सोहळ्याने समाजएकतेचा जागर*

समाज मेळावा उत्साहात संपन्न

*सोलापूर येथे सोनार समाजाचा ऐतिहासिक मेळावा उत्साहात संपन्न; विविध पुरस्कार व गुणगौरव सोहळ्याने समाजएकतेचा जागर*
सोलापूर — सोलापूर येथे सोलापूर जिल्हा संत नरहरी सोनार समाज संस्था यांच्या वतीने आयोजित सोनार समाजाचा ऐतिहासिक मेळावा तसेच विविध पुरस्कार व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती, शिस्तबद्ध आयोजन आणि देखण्या व्यवस्थेमुळे हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.
कार्यक्रमासाठी भव्य व दिव्य लॉन्सची निवड करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन, वेळेचे काटेकोर पालन आणि प्रत्येक बाबीवर बारकाईने लक्ष दिल्यामुळे उपस्थित समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण होते. विशेष बाब म्हणजे सर्व मान्यवर अतिथी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत व्यासपीठावर उपस्थित राहिले, ही गोष्ट आयोजकांच्या नियोजन कौशल्याची साक्ष देणारी ठरली.
तुतारीच्या निनादात सत्कारमूर्तींचे स्वागत व सत्कार करण्यात आल्याने कार्यक्रमाला पारंपरिक व सांस्कृतिक साज चढला. सत्कार सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुबक, स्पष्ट व प्रभावी असल्याने कार्यक्रमाची एकसंधता टिकून राहिली.
यावेळी प्रा. श्री. भिमाशंकर बिराजदार सरांनी आपल्या खुमासदार, प्रेरणादायी भाषणातून समाजाच्या इतिहासाचा गौरव केला तसेच वर्तमान व भविष्यकालीन वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमात उत्कृष्ट जेवण व्यवस्थेची विशेष दखल घ्यावी लागेल. स्वच्छता, दर्जा आणि चवीचा उत्तम समतोल राखत सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button