गावगाथा

खैराट शाळेत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

खैराट शाळेत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
इंग्रजी वर्षांची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते .सर्वत्र नववर्षाचे स्वागत विविधतेने केले जाते .जि .प .प्राथमिक खैराट शाळेत अतिशय आनंदी वातावरणात व जल्लोषात नववर्षाचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले .शाळेत विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरात स्वच्छता केली पाण्याचा सडा टाकून रांगोळी घातली .नवीन वर्षाच्या स्वागताला सर्व विद्यार्थ्यानी आपापल्या परीने तयारी केली .2025 या वर्षात आपण काय काय अनुभवल .चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडून गेल्या त्या पून्हा येणार नाहीत .नको असलेल्या गोष्टी सोडून दया पण पूर्ण वर्षभरात चांगल्या गोष्टी अनुभव सोबत घेऊन नवीन वर्षात सर्वांचे चांगले घडावे अशी सदिच्छा ठेऊ या आणि 2026 या वर्षाचे आनंदाने स्वागत करू या असे माहिती सांगताना रेखा सोनकवडे म्हणाल्या . फिरोजा नदाफ यांनी सर्व विद्यार्थ्याना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि माहिती सांगितली .बाळूसिंग रजपूत यांनी 2025 या वर्षात शाळेत घडलेल्या विविध घटनांची माहिती दिली .नवीन वर्षात चांगला संकल्प ठेवा निरोगी आनंदी रहा अभ्यास करून मोठे व्हा अश्या सदिच्छा दिल्या .सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आले . गुलाब पुष्प देऊन सर्व विद्यार्थ्याना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .फुगे उडवत 2026 या इंग्रजी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले गेले .यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते .खैराट गावातील सर्व पालक गावकरी आजी माजी शिक्षक कर्मचारी अधिकारी पदाधिकारी यांनाही शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने जाहीरपणे शुभेच्छा देण्यात आल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button