नुतन वर्ष आरंभी स्वामी दर्शनाने नवचैतन्याची प्राप्ती झाली – पोलीस निरीक्षक राजू जानकर
नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक महेश इंगळे यांचा जानकर कुटुंबाकडून सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.०३/०१/२६) आज ०१ जानेवारी रोजी नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा लाभ झाला.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने नववर्षात पहिल्याच दिवशी नवचैतन्याची प्राप्ती झाली असल्याचे मनोगत खारघर मुंबई येथील पोलिस निरीक्षक राजू जानकर
यांनी व्यक्त केले. आज पोलिस निरीक्षक राजू जानकर यांनी सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पोलिस निरीक्षक राजू जानकर कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी
बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक राजू जानकर यांनीही सलग पाचव्यांदा नगरसेवकपदी जनमताने निवड झाल्याबद्दल नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार केला. यावेळी व्यंकटेश पुजारी, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, धनराज स्वामी, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – महेश इंगळे यांचा सत्कार करताना पोलीस निरीक्षक राजू जानकर व कुटुंबिय दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!