गावगाथा

अंगारकी चतुर्थी मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नवीन भव्य महाप्रसादालयाच्या तळमजल्याच्या स्लॅबचे कॉक्रीट काम संपन्न 

शुभारंभ

अंगारकी चतुर्थी मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नवीन भव्य महाप्रसादालयाच्या तळमजल्याच्या स्लॅबचे कॉक्रीट काम संपन्न
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून स्वामी भक्तांसाठी सातत्याने विविध विधायक उपक्रमांच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे. श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर घालणाऱ्या न्यासाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या नवीन भव्य महाप्रसादालयाच्या इमारतीच्या तळमजल्याचा (एम-३५ श्रेणी) कॉक्रीट स्लॅब मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या शुभप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, क्रियाशील सदस्य संदीप फुगे-पाटील, साई सुश्रृत डेव्हलपर्स एल.एल.पी., पुणेचे व्यवस्थापकीय संचालक निहार अडकर यांच्यासह मनोज निकम, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, साई सुश्रृत डेव्हलपर्स एल.एल.पी. पुणेचे मुख्य अभियंता रामदास तांबे, मुख्य अधिकारी प्रशांत काळे, प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र पाटील, रमाकांत कोष्टी, कनिष्ठ अभियंता ऋषिकेश शिंदे यांच्यासह अमर बोंद्रे, बाबू चौगुले, सुभाष निकम, निखील पाटील, संजय गोंडाळ, प्रवीण घाटगे, वैभव मोरे, सनी सोनटक्के, सुमित घाडगे, बसवराज क्यार, महादेव अनगले, स्वामिनाथ मलवे, बिरप्पा व्हनझेंडे, गणेश भोसले, ज्ञानेश्वर भोसले, धानप्पा उमदी, मारुती बोरकर, समर्थ घाटगे, समर्थ चव्हाण, नामा भोसले, कुमार सलबत्ते, विशाल कलबुर्गी आदींसह मोठ्या संख्येने क्रियाशील सदस्य, सेवेकरी व कर्मचारी उपस्थित होते.
या मंगलमय सोहळ्यात न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्रपठण व विधीवत पूजन करण्यात आले.
उभारण्यात येणारे हे नवीन महाप्रसादगृह भव्य, प्रशस्त व मंदिरसदृश्य स्वरूपाचे असणार असून, संपूर्ण इमारत वातानुकूलित असेल. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र १ लाख १९ हजार ३९८ चौरस फूट इतके आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फूट उंच, सुंदर व भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल.
या महाप्रसादगृहात एकावेळी २५०० भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था असून, एकूण ५ हजार भाविकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी प्रशस्त प्रतिक्षा कक्षाची योजना करण्यात आली आहे. तळघरामध्ये धान्य व भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी, तसेच एका तासात ८०० चपात्या तयार करणाऱ्या ७ अत्याधुनिक मशिन्स व भांडी धुण्यासाठी डिश वॉशरची सोय असेल. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी भव्य इमारत स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होत असून, या प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे ६० कोटी रुपये अपेक्षित आहे. नोव्हेंबर २०२४ पासून हे काम प्रगतीपथावर असून, येत्या दोन वर्षांत हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत खुले होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button