गावगाथा

पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये पत्रकारांचा सन्मान – नूतन नगरसेवक सद्दाम शेरिकर यांच्या हस्ते गौरव

दिनविशेष

पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये पत्रकारांचा सन्मान – नूतन नगरसेवक सद्दाम शेरिकर यांच्या हस्ते गौरव
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
नूतन नगरसेवक पैलवान सद्दाम शेरिकर मित्र परिवार, अक्कलकोट यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नूतन नगरसेवक पैलवान सद्दाम शेरिकर यांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचे समाजातील योगदान अत्यंत मोलाचे असून, सत्य, पारदर्शकता व जनहित जपण्याचे कार्य पत्रकार बांधव प्रामाणिकपणे करत असल्याचे मत नगरसेवक सद्दाम शेरिकर यांनी यावेळी व्यक्त केले. समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या अडचणी, विकासकामांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ अथवा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभामुळे पत्रकार बांधवांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी मित्र परिवाराचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूतन नगरसेवक पैलवान सद्दाम शेरिकर मित्र परिवारातील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button