श्री वटवृक्ष मंदिर समितीचे कार्य आदर्शवत – इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अमोल जोशी
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर अमोल जोशी यांनी व्यक्त केले मनोगत.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट,दि.०६/०१/२६) आज जगाची वाटचाल २१ व्या शतकात चालू असताना भारतासारख्या धर्मप्राय देशात शैक्षणिक क्रांती सोबतच अजूनही श्रद्धा, भक्तीभाव पूर्णपणे ओसंडून वाहत आहे. त्यातच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणूनच स्वामी समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर महाराष्ट्रातील अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील वटवृक्ष छायेची निवासाकरिता निवड करून घेतली आहे. स्वामी समर्थांचे येथील जागृत वास्तव्य पाहता स्वामींचे अनेक भक्त नित्यनेमाने उदयास येत आहेत. म्हणूनच महाराजांच्या या मंदिरात सर्व धर्म समभाव जोपासून सर्व जाती धर्माचे लोक महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असतात. त्यामुळे स्वामी समर्थांची महिमा दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व स्वामी भक्तांना उत्तम स्वामी दर्शनाचे नियोजन करण्यासाठी मंदिर समितीचे अहोरात्र प्रयत्न चालू असतात. मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली मंदिर समितीचे हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने चालत आहे, ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्य आपणास आदर्शवत वाटत असल्याचे मनोगत सोलापूर येथील इंडीयन मॉडेल स्कूल ग्रुपचे संस्थापक अमोल जोशी यांनी व्यक्त केले. आज नुतन वर्षानिमीत्त अमोल जोशी व संस्थेच्या संचालिका तथा अमोल जोशी यांच्या सुविद्य पत्नी सायली जोशी यांनी
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अमोल जोशी व सायली जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी अमोल जोशी
बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नंदकुमार गोसावी, संजय शिंदे, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – अमोल जोशी व सायली जोशी यांचा यांचा वटवृक्ष मंदिर अतिथी कक्षात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!