प्रचारासाठी एकत्र आले आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे!
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत उसळली हजारोंची गर्दी; औक्षण आणि पुष्पवृष्टीने झाले उमेदवारांचे स्वागत
सोलापूर : ढोल ताशांचा गजर, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औक्षण, पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली. आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला.
चौत्रा पुणे नाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पुरुषोत्तम बरडे, प्रभाग ७ चे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे, उमेदवार आनंद कोलारकर, पद्माकर काळे, उत्तरा बरडे – बचुटे, श्रद्धा पवार, भाजपच्या सरचिटणीस सुद्धा अळीमोरे, सतीश कुदळे, किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार विजयकुमार देशमुख, मी स्वतः, ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, पद्माकर काळे आणि प्रभागात राहणारे सर्व दिगग्ज नेते एकत्र आले आहेत. प्रभाग क्रमांक ७ मध्ये निघालेली भव्य पदयात्रा ही या प्रभागातील भाजपच्या विजयाची नांदी आहे. २०१२ सालापासून १० वर्षे या प्रभागाने मला नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याच जोरावर मी प्रभागासह शहरात विविध ठिकाणी विकास करू शकलो. प्रभाग क्रमांक ७ हे माझे कुटुंब आहे. नगरसेवक असताना या प्रभागासाठी भरघोस निधी आणण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला आहे. सध्या शहरात भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सोलापूर शहराला भक्कम पाठबळ आहे. या जोरावर प्रभाग क्रमांक ७ सह शहरासाठी भरघोस निधी आणून शहराचा कायापालट करण्यासाठी भाजपा सज्ज आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.
पारंपारिक ढोल ताशे, हलग्यांचा कडकडाट, हाती भाजपाचे झेंडे, गळ्यात भाजपाचे शेले, ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ च्या घोषणांमुळे प्रभाग क्रमांक ७ परिसर भाजपमय झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या छबी असलेले फलक धरले होते.
हजारोंच्या गर्दीत जुना पुणे नाका येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा हांडे प्लॉट, अवंती नगर, रो हाऊस भाग एक, भाग दोन, थोबडे नगर, निराळे वस्ती, जुनी पोलीस लाईन, दूध पंढरी परिसर मार्गे राघवेंद्र मठ परिसरात विसर्जित झाली.
भाजप उमेदवारांच्या पदयात्रेचे प्रभाग क्रमांक ७ मधील मतदारांनी जागोजागी उत्स्फूर्त स्वागत केले. नागरिकांनी घरासमोर कमळ चिन्हाच्या रांगोळ्या तसेच फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. उमेदवारांचे औक्षण करत पुष्पवृष्टी करून आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. बुधवारी प्रभाग क्रमांक ७ मध्ये झालेली भाजपाची प्रचंड मोठी पदयात्रा विरोधकांना धडकी भरवणारी असून ही भाजपाच्या प्रभाग क्रमांक ७ मधील विजयाची नांदी आहे, असे मतदारांनी सांगितले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!