साहित्य जिवंत ठेवण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी – शरद अत्रे
पुणे (प्रतिनिधी) थोर विचारवंतानी आपल्या साहित्यातून, साहित्य परंपरा गेली हजारो वर्षे जिवंत ठेवली, त्यामुळे साहित्यिक म्हणून, आज आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे.असे प्रतिपादन शरद अत्रे तर यांनी केले. मराठबोली पुणे आयोजित, राज्यस्तरीय काव्यवाचन, काव्यलेखन व राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला, उच्च नैतिक सामाजिक विचाराच्या मूल्याचे अधिष्ठान आहे, विश्वधर्माची सर्व जगाला शिकवण देणारे आपण भारतीय आहोत.
पुढे ते म्हणाले की, सामाजिक नैतिकता जपणाऱ्या साहित्यिक, विचारवतानाच दिवाळी अंकातून प्राधान्य द्या.
सदर प्रसंगी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या जवळजवळ सत्तर स्पर्धकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी, व्यासपीठावर, हेमंत परब, शिवाजी उराहे, श्रीपाद टेंबे, वैशाली गावंडे, उत्तम सोनवणे, रामेश्वर गोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार, सचिन कुरकुटे यानी मानले.
राज्यस्तरीय दिवाळी अंक व काव्य लेखन स्पर्धा २०२५ चा निकाल पुढील प्रमाणे आहे
***दिवाळी अंक स्पर्धा***
प्रथम पुरस्कार विभागून
१. अर्थशक्ती, मुंबई
२. आनंद तरंग, पुणे
३. समतोल
४. गावगाथा, सोलापूर
५. कलासागर
६. चिरांगण
द्वितीय पुरस्कार विभागून
१. लोकनिर्माण
२. शिवतेज
३. धनश्री
४. दर्यावर्दी
५. पत्रकार, दर्पण
तृतीय पुरस्कार विभागून
१. डहाणू वार्ताहर
२. पूनवा
३. दिवेलागण
४. परळी परिसर
सातत्यपूर्ण उच्च दिवाळी अंक निर्मिती साठी विशेष सन्मान
१. थिंक पॉझिटिव्ह
२. निर्मळ राणवारा
३. अंतरीचे प्रतिबिंब
४. क्रिक कथा
५. सृजन संवाद
***काव्यलेखन स्पर्धा***
प्रथम क्रमांक विभागून
१. सुजाता बानगुडे, पुणे
२. मुग्धा टेंगसे, कोल्हापूर
३. शोभना सूर्यवंशी, नाशिक
द्वितीय क्रमांक विभागून
१. वैजयंती कुलकर्णी, पुणे
२. स्वाती कानसकर, पुणे
३. सुदीप पवार
तृतीय क्रमांक विभागून
१. उषा शेटीया
२. सुनील जाधव
३. सीमा भामरे, नाशिक
४. दादासाहेब पुंडे
५. चंद्रकांत बोऱ्हाडे
६. गोविंद पाठक
Back to top button
×
No WhatsApp Number Found!