गावगाथा

*महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक कौशल्ये आत्मसात करावीत* सुरेखा होळीकट्टी

वागदरी येथे श्रमसंस्कार शिबिरात महिलांच्या जीवनातील आव्हाने परिसंवाद

*महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आर्थिक कौशल्ये आत्मसात करावीत*
सुरेखा होळीकट्टी
वागदरी येथे श्रमसंस्कार शिबिरात महिलांच्या जीवनातील आव्हाने परिसंवाद
अक्कलकोट
महिलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाभिमुख आर्थिक कौशल्ये आत्मसात करावीत त्यातून कुटुंबात सन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा देखील उंचावेल असे प्रतिपादन मैंदर्गी नगर परिषदेच्या नूतन नगरसेविका सुरेखा होळीकट्टी यांनी केले
कल्याणशेट्टी महाविद्यालयाने वागदरी येथे आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिलांच्या जीवनातील आव्हाने विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य शारदा रोटे होत्या व्यासपीठावर राजश्री शेळके ज्योती बेटगिरी रमाबाई घुले भाग्यश्री चव्हाण ज्योती सावंत रेखा बाबर ममता बकोरगी सुप्रिया इंगळे अनुजा कणसे उपस्थित होत्या
पुढे बोलताना होळीकट्टी म्हणाल्या की महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. संगणक प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता, शिवणकाम, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कृषीपूरक उद्योग यांमुळे महिलांना घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वयं-सहायता बचत आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्या पुढे म्हणाल्या की सरकारी योजना मुळे महिलांच्या आत्मनिर्भरतेला मोठा आधार मिळत आहे. महिला उद्योजकतेसाठी मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान योजनांद्वारे कर्ज, प्रशिक्षण व बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन बापूजी चव्हाण व समर्थ पवार यांनी केले तर आभार प्रा राजशेखर पवार यांनी मानले
चौकटीतील मजकूर
महिलांनी उद्योग व्यवसायातून अर्थार्जन करावे
महिलांवर कौटुंबिक आव्हाने पेरण्या ची जबाबदारी असते म्हणून महिलांनी लघुउद्योग तसेच व्यवसायातून अर्थार्जन केले पाहिजे असे परिसंवादात आपल्या भाषणातून राजश्री शेळके यांनी सांगितले
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालय आयोजित महिला परिसंवादात बोलताना नूतन नगरसेविका सुरेखा होळीकट्टी व मान्यवर महिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button