युवकांनी शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करावे –अभिषेक जोजन
अक्कलकोट :
युवक ऊर्जावान व संवेदनाशील असतो, त्याच्याकडे यशस्वी जीवनाची वाटचाल करण्याची तसेच ध्येय निश्चित करण्याची प्रवृत्ती असते म्हणून त्याने गांभीर्याने शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करावे असे प्रतिपादन अभिषेक जोजन यांनी केले.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वागदरी येथे आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते, यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बापूराव चव्हाण उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय, आरोग्यविषयक जनजागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांत युवक सक्रिय भूमिका घेऊ शकतात. स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना आणि सामाजिक चळवळीं च्या माध्यमातून युवक समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून शाश्वत विकासाला चालना देतात.
आर्थिक शाश्वततेच्या बाबतीत युवकांचे कौशल्य, नवोपक्रम आणि उद्योजकता महत्त्वाची ठरते. कौशल्याधारित शिक्षण, आधुनिक शेती, हरित उद्योग, स्टार्टअप्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून युवक रोजगारनिर्मिती करू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यार्थी परिषद, युवक संसद, सामाजिक चळवळी आणि डिजिटल माध्यमातून युवक विकासविषयक प्रश्न मांडू शकतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा ओंकार घिवारे यांनी केले सूत्रसंचलन समर्थ पवार यांनी केले आभार प्रा राजशेखर पवार यांनी मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!