गावगाथा

अक्कलकोट नगरपरिषद नगराध्यक्ष पदगृहण व उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवड १२ जानेवारीला होणार

उपनगराध्यक्ष निवडीतही राहणार भाजपचे वर्चस्व

अक्कलकोट नगरपरिषद नगराध्यक्ष पदगृहण व उपनगराध्यक्ष,
स्वीकृत सदस्य निवड १२ जानेवारीला होणार
उपनगराध्यक्ष निवडीतही राहणार
भाजपचे वर्चस्व
अक्कलकोट, दि. ८ : अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदगृहण सोहळा, विशेष सभा तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम येत्या १२ जानेवारी रोजी पार
पडणार आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले असून, या दिवशी नगर परिषदेतील महत्त्वाच्या निवडी होणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या अक्कलकोट
नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार
सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश संपादन केले आहे.
या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, नगर परिषदेत पक्षाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. या निवडणुकीत
मिलन कल्याणशेट्टी यांची थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
एकूण २५ नगरसेवकांपैकी तब्बल २२ सदस्य भाजपचे निवडून आले असून, केवळ तीन जागा विरोधी गटाला मिळाल्या आहेत. भाजपकडे बहुसंख्य सदस्यसंख्या असल्याने नगर परिषदेतील निर्णय प्रक्रियेवर पक्षाचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बहुमताच्या जोरावर भाजपला तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे नगर परिषदेत भाजपची संख्या आणखी वाढणार असून, प्रशासकीय आणि विकासकामांच्या दृष्टीने पक्षाला अधिक बळ मिळणार आहे.
दरम्यान, या होणाऱ्या विशेष सभेत मिलन कल्याणशेट्टी हे अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्याच सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया देखील
पार पडणार असून, या पदावरही भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे.
एकूणच अक्कलकोट नगर परिषदेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असून, आगामी काळात शहराच्या विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button