पत्रकारांनी समाज परिवर्तनास गती देण्यासाठी विकासाचे प्रश्न वृत्तपत्रातून मांडावेत ; मल्लिनाथ कल्याणशेट्टी
वांग्मय मंडळाकडून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट :
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरू केले, त्यामुळे राजकीय तसेच सामाजिक जाणिवा प्रगल्भ झाल्या, आता याच विषयाचा धागा पकडून पत्रकारांनी वृत्तपत्रातून विकासाचे प्रश्न मांडावेत तरच समाज परिवर्तन जलद गतीने होईल असे प्रतिपादक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील वांग्मय मंडळाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या प्रसंगाला दृकश्राव्य प्रसार माध्यमे महत्त्व देत आहे. त्यामुळे विकासाचे प्रश्न बाजूला पडत आहेत. शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, रस्ते, वीज, पाणी आदी विकासाचे प्रश्न मागे पडत आहेत. लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील प्रश्न जटील होत आहेत. त्यास प्रसिद्धी देण्याची जबाबदारी पत्रकारांनी स्वीकारली पाहिजे.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले आभार प्रा ओंकार घिवारे यांनी मानले
या कार्यक्रमास प्रा. हर्षदा गायकवाड, शितल फुटाणे, शिवकुमार मठदेवरु, लक्ष्मण लिगाडे, शितल टिंगरे उपस्थित होते.
फोटो ओळ
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!