जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त कुरनूरमध्ये भव्य कुस्ती आखाडा संपन्न….
कुरकूर — राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, कुरनूर यांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने कुरनूर गावात भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी अन्नछत्र मंडळ, अक्कलकोटचे अध्यक्ष अमोल राजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश मालक इंगळे, किणी भाजप मंडळ अध्यक्ष अमोल हिप्परगी, विनीत पाटील, हर्षद नाना मोरे, जैनुद्दीन पठाण, तम्मा मामा शेळके (नगरसेवक, अक्कलकोट) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव लौकिक करणारे वस्ताद भरत मेकाले, मौला शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुस्ती स्पर्धेचे पंच म्हणून लक्ष्मण शिंगटे, नामदेव भाले व स्वामीराव सुरवसे बाबासाहेब शिंदे, यांनी काम पाहिले. कुस्तीसाठी कोल्हापूर, सांगोला, लोहारा, धाराशिव आदी विविध भागांतून नामवंत पैलवान उपस्थित राहिले होते.
२५,६५९ रुपयांच्या कुस्तीत मशीद शेख यांनी कडवी झुंज देत नागेश कलागते यांचा पराभव केला. तसेच अंतिम ५१,१११ रुपयांच्या कुस्तीत कोल्हापूरचे विक्रम गायकवाड व उदयसिंह खांडेकर यांच्यात अटीतटीची लढत होऊन कुस्ती बरोबरीत सुटली.
स्पर्धेअंती सर्व विजेत्या व उपविजेत्या कुस्तीपटूंचा आखाड्यात सन्मान करण्यात आला. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह अनुभवला.
*कुस्ती आयोजनाचे हे पहिलेच वर्ष असून, भविष्यात यापेक्षा अधिक भव्य स्वरूपात आयोजन करण्यात येईल, असे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत बिराजदार यांनी सांगितले.*
कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठांचे उत्सव समिती अध्यक्ष केदार मोरे उपाध्यक्ष सुभाष मोरे सचिव नारायण निंबाळकर खजिनदार अर्जुन सलगरे मीडिया प्रमुख किसन मोरे मंडळाचे आधारस्तंभ समाधान मोरे संभाजी मोरे मनोज सुरवसे गोपाळ बिराजदार तानाजी मोरे वैभव मोरे आकाश बिराजदार शुभम मोरे सुमित बिराजदार सागर मोरे नेताजी मोरे रवी कोळी आकाश सुरवसे बालाजी बिराजदार ओमकार बिराजदार किरण मोरे शुभम अलगुडे या सर्वांनी परिश्रम घेतले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!