सोलापूरच्या प्रा.ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी…
सोलापूर : सोलापूर साठी आनंदाची बातमी समोर येत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून राज्यसभेसाठी सोलापूरच्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
बुधवार पर्यंत शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांच्या नावाचे चर्चा होते परंतु गुरुवारी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाघमारे यांचे नाव राज्यसभेसाठी आल्याने सोलापुरातून सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना न्याय दिला अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2024 ची लोकसभा 2024 ची विधानसभा निवडणूक प्रचाराची जबाबदारी ज्योती वाघमारे यांनी सांभाळली. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पद सांभाळताना त्यांनी पक्षाची बाजू राज्यस्तरावर जोरदार लावून धरली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या कार्याची दखल घेत राज्यसभेची उमेदवारी बहाल केली आहे.
Jyoti Waghmare: कोण आहेत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे?
सोलापूरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. मोची समजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरीब कुटुंबाची आहे. शैलीदार निवेदिका, फर्ड्या वक्त्या म्हणून ज्योती वाघमारे या सोलापूरकरांना परिचित आहेत. मातृभाषा तेलगू, इंग्रजी भाषेत पीएचडी, मराठीवर प्रभुत्व असल्याने ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात.
गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम केले आहे. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे, पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
ज्योती वाघमारे यांनीदेखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले होते. पण नंतर त्या राजकारणापासून अलिप्त झाल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडली. अनेक जाहीर सभांमधून त्यांनी ठाकरे गटावर तोफ डागण्याचे काम केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. जून 2022 रोजी शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेत पडलेल्या फुटीत त्यांना संधी मिळाली. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे गटात महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती. त्यांनी प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्याचे काम केले. त्याचे बक्षीस म्हणून शिंदे गटाकडून त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.
Maharashtra Politics news: प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी
* इंग्रजी साहित्यात पीएचडी
* दहावीच्या परिक्षेत ज्योती वाघमारे यांना ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
* बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम
* महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
* १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव
* सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील श्री. नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी श्री. नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटरचे तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले.
* चळवळीतील कामाचा पोचपावती म्हणून सोलापूरमधील नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत श्री. नागनाथ वाघमारे यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी काहीकाळ वृत्त निवेदिका म्हणून काम केलं.
* पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली.
* वालचंद महाविद्यालयात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्राध्यापिका म्हणून काही काळ काम केले.
* महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि राज्याच्या राजकारणावरील सखोल अभ्यासपूर्ण भाषण ही प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची वैशिष्ट्ये आहेत.
* सलग तीन दसरा मेळाव्यात घणाघाती भाषणातून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
* जनतेतला धडाकेबाज चेहरा खासदार झाल्यास सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विस्तारासाठी फायदा होईल.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!