गावगाथा

कै.कल्याणराव-बाळासाहेबांचं पुण्यस्मरणदीन सर्वांसाठी एक प्रेरणादायी प्रवास – श्री.म.नि.प्र. डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी

१० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त कै.कल्याणराव इंगळे स्मृती उद्यानात कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्याचे महास्वामीजी व नगराध्यक्षांच्या हस्ते अनावरण व अभिवादन.

कै.कल्याणराव-बाळासाहेबांचं पुण्यस्मरणदीन सर्वांसाठी एक प्रेरणादायी प्रवास – श्री.म.नि.प्र.
डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी

१० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त कै.कल्याणराव इंगळे स्मृती उद्यानात कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्याचे महास्वामीजी व नगराध्यक्षांच्या हस्ते अनावरण व अभिवादन.

स्मृती उद्यान व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील अर्धपुतळ्यास अभिवादन केल्यानंतर नागणसूर तुप्पीन मठाचे श्री.म.नि.प्र.
डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी व्यक्त केले मनोगत.

इंग्रजी कार्यशाळेसह तंत्रनिकेतन महाविद्यालय व कराड येथील हुतात्मा अपंग बहूउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व गुणवंतांना पुरस्कार आणि सन्मान.

(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.१८/०३/२६)
दरवर्षी १८ मार्च उगवले की मनातील गाभाऱ्यात सामावलेले कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे यांच्या स्मृती जागृत होतात ते स्वामी सेवक कै.बाळासाहेबांच्या अजरामर सेवाभावामुळे. कै.बाळासाहेबांची ही सेवाभाव प्रवृत्ती व त्यांचे पुण्यस्मरण दिन आम्हाला आजही नेमहीच प्रेरणा देत असते, म्हणून कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेबांचं पुण्यस्मरणदीन आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी प्रवास असल्याचे भावोद्गार नागणसूर येथील
तुप्पीन मठाचे श्री.म.नि.प्र.डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी काढले.


आज कै.कल्याणराव इंगळे स्मृती उद्यान व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात मंदीर समितीचे व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली व प.पू.मोहनराव (गुरुजी) पुजारी, हिरेमठ गौडगांव संस्थानचे शिवाचार्यरत्न श्री.ष.ब्र.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, जगदगुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान नागणसूर तुप्पीन मठाचे श्री.म.नि.प्र.डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामीजी, अक्कलकोट विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी, मादन हिप्परगा विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र.अभिनव महाशिवलिंगेश्वर महास्वामीजी,
हत्तीकणबस विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र. प्रभूशांत स्वामीजी, श्री.स्वामी समर्थ समाधी मठाचे वे.शा.प.पू.अण्णू महाराज पुजारी यांच्या दिव्य सान्निध्यात नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, महाराष्ट्र राज्य शिवभक्त प्रतिष्ठानचे पै.अनिकेतभाऊ घुले, करमाळा पंचायत समितीचे मा.सभापती संपतराव शिंदे, कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे, पुणे येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे चेअरमन गणेश करे-पाटील, मडगाव गोवा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे संस्थापक जयेश नाईक, माजी पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर स्वामी, चिपळूण येथील उद्योजक डॉ.विलास मोरे, डॉ.विजय माटे,
दिलीप भाऊ सिध्दे, देवस्थानचे विश्वस्त संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख,
माण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष साधना गुंडगे, करमाळ्याचे बाळकृष्ण लावंड, पक्षीमित्र कल्याणराव साळूंखे, नगरसेविका अपर्णाताई सिध्दे,
नगरसेवक अविनाश मडीखांबे, पोलीस निरीक्षक भिताडे साहेब, नगरसेवक शिवकुमार स्वामी, नन्नू कोरबू, दहिवडी माणचे सिध्दार्थ गुंडगे, कलाकार अथर्व कर्वे, साक्षी महाजन कर्वे आदींसह ज्ञात अज्ञात मान्यवरांनी कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले. यावेळी उद्यानातील महालक्ष्मी मंदीराच सुशोभिकरण शुभारंभ व पुजन ही करण्यात आले.


यावेळी श्री.म.नि.प्र.डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी बोलत होते. यावेळी कै.कल्याणराव इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमीत्त इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या आरोग्य शिबीर, ॲक्युप्रेशर शिबीर, रक्तदान शिबीर आदी उपक्रमांचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले. ९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन कडून डॉ.प्रचिती पुंडे यांना महास्वामीजींच्या हस्ते गुणीजन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कराड येथील हुतात्मा अपंग बहूउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने
राज्यातील ३२ गुणीजनांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय गुणीजन पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन मधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात जनरल फिजीशीयन डॉ.स्वप्निल हिप्परगी, डॉ.रोहित कुंभार, नेत्ररोग तज्ञ डॉ.स्वप्ना हिप्परगी, डॉ.राजेश मलंग, दंतरोग तज्ञ डॉ.नम्रता पवार यांच्या वतीने सर्वरोग निदान आरोग्य शिबीराच्या माध्यमातून १४७ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार व पुढील सेवाभावी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संतोष पराणे, खाजप्पा झंपले, सुनिल पवार, बाळासाहेब एकबोटे, स्वामी हिरेमठ, डॉ.हिरण्णा पाटील, कोल्हापूरचे स्वामी भक्त सुहास पाटील, माळशिरस ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विजयसिंह माने-देशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, सचिन किरनळ्ळी, बाबा सुरवसे, मुंबईचे स्वामी भक्त सुंदर जाधव, शरण मठाचे विश्वस्त बसवराज आलमद, चंद्रकांत सोनटक्के, मनोज जगताप सर, श्रीकांत झिपरे, अरविंद पाटील, मनोज इंगुले, श्रीशैल गवंडी, रमेश शिंदे सर, अंकूश केत, ज्ञानेश्वर भोसले, राजू एकबोटे, रामलिंगय्या स्वामी, सागर गोंडाळ, कुमार हत्तुरे, विश्वनाथ देवरमनी सर, नंदकुमार जगदाळे, प्रसाद पाटील सर, प्रविण देशमुख, सैदप्पा इंगळे, स्वामीनाथ लोणारी, ऋषिकेश लोणारी, सुरेश वाले सर, नरसिंग क्षीरसागर, प्रशांत गुरव, गणेश दिवाणजी, सिद्धाराम टाके, अभिषेक लोकापूरे, मेजर अमोल माने,
प्रसन्न हत्ते, शैलेश राठौर, शेखर आडवितोटे, प्रज्वल गवंडी, दर्शन घाटगे, तुषार मोरे, उदय जमगे, सुनिल नाईकवडी, रवि मलवे, श्रीकांत मलवे आदींसह ज्ञात अज्ञात आप्तेष्ट व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागनाथ जेऊरे आदींसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवानी भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.काशिनाथ घुरघुरे, प्रा.शिवशरण अचलेर यांनी मानले.

(चौकट – आज बाळासाहेब इंगळे यांची पुण्यतिथी… एक असा दिवस, जो आठवणींनी डोळे पाणावतो आणि त्यांच्या कार्याची जी जाणीव पुन्हा एकदा अंतर्मनात जागवतो. बाळासाहेब इंगळे हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हते, तर ते एक चालते-बोलते स्वामीभक्तीचे विद्यापीठ होते. देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जी निस्वार्थ सेवा केली, ती खरोखरच अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यामध्ये केवळ व्यवस्थापन नव्हते, तर त्यात श्रद्धा, समर्पण आणि स्वामींवरील अखंड विश्वास यांचा संगम होता.आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्याला आणि विचारांना पुढे नेण्याचा संकल्पच त्यांना खरी आदरांजली ठरेल. – श्री.नागनाथ जेऊरे – प्राचार्य कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालय, अ.कोट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button