गावगाथा

भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मार्ग स्वामी भक्तीत दडले आहे – सांस्कृतिक मंत्री आ.आशिष शेलार

सांस्कृतिक मंत्री आ.आशिष शेलार यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.

भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मार्ग स्वामी भक्तीत दडले आहे – सांस्कृतिक मंत्री आ.आशिष शेलार

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आ.आशिष शेलार यांनी व्यक्त केले मनोगत.

सांस्कृतिक मंत्री आ.आशिष शेलार यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.

(श्रीशैल गवंडी, दि. २०/०३/२६) अ.कोट
श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील श्री वटवृक्ष मंदिरातील प्रसन्न वातावरण आपणास नेहमीच प्रफ्फुलीत वाटते. आज श्री स्वामी समर्थांचे प्रकट दिन. या पावन दिवशी श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीत व वटवृक्ष मंदिरात येता आल्याने जीवन धन्य झाले आहे. श्री स्वामी भक्तीला माझ्या जीवनात नेहमीच प्राधान्य आहे, कारण भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मार्ग स्वामी भक्तीत दडले आहे असे मनोगत
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक प्रौद्योगिक मंत्री व बांद्रा मुंबई विधानसभा मतदार संघाचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांनी आ.आशिष शेलार यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी आमदार आशिष शेलार बोलत होते. पुढे बोलताना
आ.आशिष शेलार यांनी या प्रसन्न वातावरणामुळे मनात स्वामीमय भक्तीचा आनंद सागर तरळतो, त्यामुळे स्वामी दर्शनाची आस नेहमी लागणे साहजिकच आहे. अशा या स्वामी समर्थांच्या जागृत स्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरास वेळोवेळी भेट देऊन नेहमी श्री स्वामी दर्शनाचा लाभ घेता यावा याकरिता ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगतही व्यक्त केले.
या प्रसंगी महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी सदस्य शहाजी भाऊ पवार, प्रथमेश इंगळे, अक्कलकोट नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे,
शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रवीण देशमुख, अभिषेक लोकापुरे, नन्नू कोरबू, अविनाश महागावकर, लखन झंपले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, धनराज स्वामी, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ – आ.आशिष शेलार यांचा सत्कार करताना महेश इंगळे,
नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व
अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button