Akkalkot Rural | नाविंदगी श्री प्रभु मल्लेश्वर बैलगाडा शर्यत उत्साहात ; हैद्रेचा प्रथम तर सलगर चा द्वितीय क्रमांक

नाविंदगी (प्रतिनिधी / दयानंद गौडगांव) ; अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे श्री प्रभु लिंगेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हैद्रा येथील संघर्ष योध्दा १६१६ यांना प्रथम क्रमांकाचा बक्षीस बहाल करण्यात आला आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील आणि शेजारील कर्नाटक राज्यातून देखील बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. नाविंदगी गावात यंदा प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा शर्यत सोहळा संपन्न झाला.
यामध्ये १ ते ५ क्रमांका पर्यंत बक्षीस वितरण करण्यात आले, ते खालीलप्रमाणे :
१) प्रथम क्रमांक : संघर्ष योध्दा १६१६ , हैद्रा.
२) द्वितीय क्रमांक: शिवबसवेश्वर विरक्त मठ कारुणी, सलगर
३) तृतीय क्रमांक : चौडेश्वरी ग्रुप , माशाळ ( कर्नाटक)
४) चौथा क्रमांक : ओंकार पारतनाळे , हन्नूर (बैलाचे नाव – खोडमुरकी)
५) पाचवा क्रमांक : आदित्य मानशेट्टी , तडवळ ( बैलाचे नाव – सर्जा )



