जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड बोरोटी (खु) शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात : जि.प. सदस्य शिवराज म्हेत्रे यांच्या हस्ते उद्घाटन
अक्कलकोट :-
जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड बोरोटी (खु) शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नूतन जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य श्री. ब्र. मरुळाराध्य शिवाचार्य महास्वामिजी, माशाळ यांनी भूषविले होते.अध्यक्षस्थानी सरपंच अशोक ढंगापूरे होते, तर गौरवाध्यक्ष म्हणून काशिनाथ कळसगोंड उपस्थित होते.
प्रतिमा पूजन प्रथमेश महेश इंगळे, वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट येथील विठ्ठल कोळी व धरेप्पा हालोळी यांच्या हस्ते पार पडले. स्टेज पूजन सादिक जमादार व संतोष कोळी यांनी केले. दीपप्रज्वलन हुसेनी नंदिवाले, के. बी. पाटील, पंडित मुळे व लक्ष्मीकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
संगीत वाद्य पूजन सोमशेखर जमशेट्टी व राजशेखर उंबराणीकर यांनी केले, तर नटराज पूजन महादेव खेड, शरणू पुजारी, प्रकाश कोळी व धानप्पा कलशेट्टी यांच्या हस्ते पार पडले. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्याचा उपक्रम लक्ष्मीपुत्र किरनल्ली, यल्लालिंग तळवार, प्रभाकर ढंगापुरे, सोमय्या स्वामी व देवेंद्र हुल्लूर यांनी पार पाडला.
यावेळी बोलताना शिवराज म्हेत्रे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
दिव्य सानिध्यातून मार्गदर्शन करताना मरुळाराध्य शिवाचार्य महास्वामिजींनी सीमावर्ती भागातील कन्नड शाळा टिकवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र राज्य सरकारांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळाल्यास ते अधिक यशस्वी होतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच युवकांनी पुढाकार घेऊन शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शाळेतील एकूण 35 विद्यार्थी 30 सांस्कृतिक कार्यक्रम करून इतिहास निर्माण केले.लावणी, हास्य नाटक,सामाजिक संदेश देणारा नाटक,व्यसनमुक्ती संदेश,पर्यावरण रक्षण करणारे संदेश नाटकातून गाण्यातून नृत्यातून दिले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले झी कन्नड सारेगमपचे गायक रेवणसिद्ध फुलारी व श्रीसनिध्य यांनी सादर केलेल्या सुंदर गीतांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यावेळी शाळेचे स्थापनेपासूनचे सर्व माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विशेष सरकार करण्यात आले.
या वेळी शाळेचे माजी शिक्षक व माजी विद्यार्थी पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख शरणप्पा फुलारी, मुख्याध्यापक राजश्री तांबे, सहशिक्षक अनंत बांगर, सहाय्यक शिक्षिका अंजली वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धाराम बिराजदार, उपाध्यक्ष चिदानंद शिंगे, गोपाल लोहार, राजू हालोळी, काशिनाथ वाडी, रविकांत लोहार यांच्यासह गावातील युवक मंडळ पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनीही सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत पाटील यांनी मानले.
फोटो ओळ :-
बोरोटी(खु) कन्नड शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन माजी विद्यार्थी शिक्षक मेळावा उद्घाटन करताना नूतन जिल्हा परिषद सदय शिवराज म्हेत्रे, श्री मरुळाराध्य महास्वामिजी,प्रथमेश इंगळे,काशिनाथ कळसगोंडा ,अशोक ढंगापूरे, हुसेनी नंदीवाले,सिद्धाराम बिराजदार,पंडित मुळे, के. बी.पाटील , राजशेखर उंबराणीकर,सोमशेखर जमशेट्टी, धरेप्पा हालोळी,विठ्ठल कोळी आदी दिसत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!