गावगाथा

३० वर्षांनंतर गावच्या यात्रेत एकत्र आले वर्गमित्र; आठवणींना उजाळा

वर्गमित्र

३० वर्षांनंतर गावच्या यात्रेत एकत्र आले वर्गमित्र ; आठवणींना उजाळा

वागदरी (ता. अक्कलकोट) – वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर रथोत्सव यात्रेच्या निमित्ताने एस. एस. शेळके प्रशालेच्या १९९६ बॅचमधील माजी विद्यार्थी तब्बल ३० वर्षांनंतर एकत्र आले. या भेटीत सर्वांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदी वातावरणात वेळ घालवला.
यात्रेच्या निमित्ताने गावात आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची भेट घेतली आणि क्षणातच शाळेच्या आठवणींत रमून गेले. शालेय जीवनातील गंमतीजमती, शिक्षकांच्या आठवणी, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम यांची चर्चा रंगली. अनेक वर्षांनंतर भेट झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आपुलकी दिसून येत होती.
या वेळी डॉ. राजकुमार नडगेरी, लक्ष्मण मंगाणे, सोन्याबापू शिंरगापरे, श्रीशेल लोहार, चंद्रकांत हुलगणे, शरण निंबाळे, राम पुजारी, मडप्पा उमराणे, संतोष सलगरे, दौलप्पा सरसंबी यांच्यासह इतर मित्र उपस्थित होते. सर्व मित्रांनी एकत्र येत गावातील एका हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखला. मित्रांच्या घोळक्यात गप्पा-गोष्टी करत जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला.
तब्बल तीन दशकांनंतर झालेल्या या भेटीमुळे सर्व मित्र भारावून गेले. आज सर्व जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असले तरी शालेय मैत्रीचे नाते अजूनही तेवढेच घट्ट असल्याचे या भेटीतून दिसून आले. गावच्या यात्रेच्या निमित्ताने झालेली ही भेट सर्वांसाठी संस्मरणीय ठरली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button