गावगाथा

राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ सौ.सुनिता पंचप्पा सोनकवडे यांना जाहीर

पुरस्कार सन्मान

राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ सौ.सविता सोनकवडे यांना जाहीर

अक्कलकोट : सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२६’ अक्कलकोट तालुक्यातील अंगणवाडी सेविका सौ. सुनिता पंचप्पा सोनकवडे यांना जाहीर झाला आहे.

अंगणवाडी केंद्र क्र. २९६, वागदरी (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथे सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सोनकवडे यांनी शिक्षण व समाजोपयोगी कार्यातून उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आविष्कार फाउंडेशनतर्फे हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सोलापूर येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, कस्तूरबा हॉल (एम्पी थिएटर) मोरारजी पेठ येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संजय पवार यांनी पाठविलेल्या निवडपत्राद्वारे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सौ. सुनिता सोनकवडे यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button